breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

आरसीबीला मोठा धक्का! ग्लेन मॅक्सवेलची IPLमधून माघार

Glenn Maxwell | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आयपीएल २०२४ च्या हंगामात ६ सामन्यात फक्त ३२ धावा केल्या. तसेच तीन सामन्यात तो शून्यावर बाद झाला. मॅक्सवेलच्या या खराब कामगिरीनंतर तो सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता. त्यामुळे विविध चर्चा रंगल्या होत्या. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकल्याने ग्लेन मॅक्सवेलने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्लेन मॅक्सवेलने म्हणाला की, सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यातून आपण स्वत: संघासाठी योगदान देऊ शकत नसल्यामुळे माघार घेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीचे काही सामने वैयक्तिकरित्या माझ्या अपेक्षेप्रमाणे नव्हते. त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे, हा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे होते. शेवटच्या सामन्यानंतर मी कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि प्रशिक्षकांशी बोललो. त्यानंतर अन्य खेळाडूला संधी द्यायची असे ठरले. मी याआधीही अशा परिस्थितीत होतो. सध्या मी स्वत:ला मानसिक आणि शारीरिक आराम देण्याचे काम करत आहे.

हेही वाचा   –    ‘निवडणूक रोखेंच्या माध्यमातून भाजपाने..’; संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका 

संघाची कामगिरी पाहता हा निर्णय घेणे फारसे अवघड नव्हते. आमचा संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नाही, हे आकडे स्पष्टपणे दाखवतात. याशिवाय वैयक्तिकरित्या मी सतत फ्लॉप होत होतो. त्यामुळे मला असे वाटले की, मी सकारात्मक योगदान देऊ शकलो नाही, दुसऱ्या खेळाडूला संधी देणे योग्य ठरेल. मात्र, मी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला, असंही ग्लेन मॅक्सवेल म्हणाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button