breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहर भाजपकडून दहशतवादी हल्ल्याचा निषेध

पिंपरी, ( महा ई न्यूज ) – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी पिंपरी-चिंचवड शहर भाजपकडून निषेध व्यक्त करण्यात आला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. तसेच शहीद जवांनाना श्रध्दांजली वाहण्यात आली.

पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक विलास मडिगिरी, उमा खापरे, आशा शेंडगे, बाबासाहेब त्रिभुवन, शीतल शिंदे, नामदेव ढाके, सुजाता पालांडे, शशिकांत कदम, राजू दुर्गे, महेश कुलकर्णी, सुरेश भोईर, दीपाली दानोकर, नेहूल कुदळे, शोभा भराडे, संजीवनी पांडे आदी वेळी उपस्थित होते.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आहे. सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. तब्बल 350 किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी (दि. 14) पुलवामा जिल्ह्यात भीषण आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 40 जवान शहीद झाले आहेत. श्रीनगर-जम्मू महामार्गावर अवंतीपुरा येथील लट्टूमोड येथे हा ताफा पोहोचला असताना हा हल्ला झाला.

दरम्यान, या वेळी, सर्व भारतीयांनी सरकारच्या पाठीशी उभं राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले. भारताच्या घरभेद्यांना धडा शिकवणं, सर्वात पहिलं आव्हान भारतासमोर आहे. शहिदांच्या कुटुंबियांना भावनिक, सामाजिक, आर्थिक अशी सर्व प्रकारची मदत करणं ही भारतीयांची प्रथम जबाबदारी आहे, असेही निषेध सभेत सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button