breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवना, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचे सर्व्हेक्षण पुर्ण

प्राथमिक टप्प्यांतील कामांचे पदाधिका-यांसह स्वयंसेवी संस्थापुढे सादरीकरण 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहरातील अतिप्रदुषित असलेल्या पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पांचे प्राथमिक स्तरांवर सर्व्हेक्षण पुर्ण झाले आहे. नद्यांचा उगमस्थान ते नदीच्या संगमापर्यंत प्रकल्प कामाचा अहवाल तयार करण्यात आला. त्या डीपीआर कामाचे महापालिकेच्या पदाधिका-यांसमोर आज (मंगळवारी) चिंचवडच्या ऑटो क्लस्टर सभागृहात सादरीकरण करण्यात आले. 

यावेळी महापौर राहुल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथजी पवार, सचिन चिखले, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, सागर आंघोळकर, करुणा चिंचवडे, संदिप वाघेरे, मोरेश्वर शेडगे, नामदेव ढाके, नाना काटे, सिमाताई सावळे, आशाताई शेंडगे, सिमा चौगुले यांच्यासह शहरातील स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधी, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांचे प्रतिनिधी, जिवित नदी, जलबिरादरी, पीसीसीएफ, देवराई फौंउंडेशन, ईसीए, आर्ट ऑफ लिव्हींग अशा विविध संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना व इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या कामाचा अहवाल [DPR] तयार करणेसाठी M/s. HCP Design, Planning & amp; Management Pvt Ltd यांची जून २०१८ रोजी नेमणूक करण्यात आली. त्यांनी पवना व इंद्रायणी नदीपात्राचा पूर्ण सर्व्हे करुन नदीमध्ये ठिकठिकाणी मिसळणारे सांडपाणी, बांधकामाचा राडारोडा टाकून नदीमध्ये ठिकठिकाणी करणाऱ्यात येणारा अनाधिकृत भराव, कमी होणारे नदीचे पात्र याविषयी अभ्यास पूर्ण केला आहे. तसेच नदीच्या दोन्ही काठावर असणाऱ्या खाजगी व सरकारी जमीनीचा सर्व्हे करुन त्याचे लॅन्ड रेकॉर्डची पूर्ण माहिती घेण्यात आली आहे.

या सादरीकरणास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रकल्पाबाबत प्राथमिक माहिती दिली. तसेच सदरची बैठक शहरातील पर्यावरणप्रेमी, नागरिक व स्वंयसेवी संस्थांच्या बरोबर नदीप्रकल्पाबाबत संवाद साधला. तसेच सर्वांनी नदी सुधार विषयी आपल्या संकल्पना व अपेक्षा देण्याचे आवाहन केले. त्यावेळी M/s. HCP Design, Planning & Management Pvt Ltd यांचे प्रतिनिधी कुणाल पटेल आणि गणेश आहिरे यांनी आतापर्यंत झालेल्या कामाचे सादरीकरण केले.

महापौर राहूल जाधव म्हणाले की, इंद्रायणी व पवना नदीला प्रदुषित करणा-या सर्व नाल्यांचे पाणी शुध्दीकरण करुन ते पाणी नदीत सोडावे, तसेच नदीचे कमी अधिक असणारे पात्र रुंदीकरण करण्यास शेतक-यांच्या ग्रीन झोन जमिनीवर घेण्यासाठी वेगळे धोरण तयार करावे, त्यामुळे नद्याचा विकास योग्य रितीने करण्यास निश्चित मदत होणार आहे. तसेच सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यासह नगरसेवकांनी सदरील प्रकल्प लवकरात लवकर हाती घेऊन पर्यावरणपुरक पध्दतीने पूर्ण करावे, अशा सुचना केल्या. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे, सहशहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी उपस्थित होते.

दरम्यान, ज्यांना नदीबाबत अजून काही सुचना करावयाच्या आहेत. त्यांनी येत्या आठवड्यापर्यंत मनपाच्या पर्यावरण विभागाच्या [email protected] या ई-मेलवर लेखी स्वरुपात सुचना पाठविण्याचे आवाहन केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button