TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

शिवाजी पार्कमधील तमाशाकरांचा मेळावा

नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधील दसरा मेळाव्यावर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सडकून टीका केली आहे. शिवाजी पार्कमधील मेळावा तमाशाकरांचा मेळावा होता, अशा शब्दात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. नारायण राणे यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.

यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी केलेलं एकतरी काम सांगा? 5 तारखेच्या मेळाव्यात सांगितले पाहिजे होत मी हे हे केलं, हा उजेड पाडला मी.. एकतरी सांगण्यासाठी सारखं आहे का, एकही नाही. सामनात सभेचा फोटो पाहिला विरळ विरळ लोकं बसवली होती. उद्धव ठाकरेंचे भाषण सुरु होताच लोक उजव्या बाजून बाहेर निघायला लागली. बाळासाहेब भाषणासाठी उभे राहत होते तेव्हा भाषण संपेपर्यंत एक माणूस जागेवरून हलत नव्हता. काय गुणवत्ता पात्रता तुमची… काहीही विचारलं तरी मला माहित नाही मला येत नाही. याशिवाय काही उत्तरं दिली नाही, मग झालात कशाला मुख्यमंत्री? यावेळचा शिवाजी पार्कमधील मेळावा तमाशाकरांचा मेळावा होता, काय वक्ते दिले वा… अशा शब्दात राणेंनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button