breaking-newsगणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

गणेशोत्सव 2023ः गणेशोत्सवातील डोळ्याचे पारणे फेडणारे देखावे

पुणे ः विलोभनीय गणेश मूर्ती…मनमोहक आरास…नजर खिळवून ठेवणारे भव्य सेट्स…जिवंत देखाव्यांमधून कधी होते देशभक्तीची जाणीव, तर कधी पौराणिक देखाव्यांच्या आधारे होते मानवी मूल्यांची ओळख. शहराच्या मध्य वस्तीतील पेठांमधून विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सादर केलेले देखावे अनुभवताना, गणेशोत्सव हा केवळ भक्ती वा कल्पनाशक्तीपुरताच मर्यादित राहिला नसून, सर्वसामान्य नागरिकांचे समाजभान जागृत करण्याचे कार्यही उत्सवाच्या माध्यमातून सुरू असल्याची प्रचिती येत असते. गणेशोत्सवातील अशाच काही डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या गणेश मंडळाचे पाहण्याजोग्या देखावेदेखाव्यांविषयी माहिती खास महाईन्यूजच्या वाचकांसाठी…

शनिवार पेठेतील श्री कडबे आळी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गाण्यांच्या तालावर लुकलुकणाऱ्या या विद्युत रोषणाईच्या मध्यभागी विराजमान झालेली बाप्पाची मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. साईनाथ मंडळ ट्रस्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळदेखील जिवंत देखावा सादर करण्यात सदैव अग्रसर असते.

अप्पा बळवंत चौकाच्या परिसरात असलेल्या करळेवाडी सार्वजनिक मंडळ ट्रस्टदेखील पौराणिक कथेवर आधारित देखावा साकारत असते.
या परिसरातील आदर्श मंडळ, तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लक्ष्मी रोडचा राजा गणपती चौक मित्रमंडळ, श्री तुळशीबाग मंडळ, जय बजरंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुण्यातील आदी गणेशोत्सव मंडळांचे देखावे आकर्षक आणि पाहण्याजोगे असतात. दरवर्षी गणेशभक्त या ठिकाणी देखावे पाहण्यासाठी गर्दी करत असतात.

सेट्सची भव्यता आणि बाप्पाची गोडी…
बाहेरगावाहून गणेशोत्सव पाहायला येणाऱ्या नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या मध्य वस्तीतील काही मंडळांनी यंदाही भव्यदिव्य सेट्स उभारले जातात.

कल्पक देखावे कौतुकाचा विषय
शहराच्या मध्य वस्तीमध्ये, विशेषतः शिवाजी रोड आणि बाजीराव रोडच्या दरम्यानच्या भागात असणारी लहान-मोठी मंडळे नागरिकांसाठी चर्चेचा विषय ठरतात. पुण्यात बाहेरगावाहून गणेशोत्सव पाहायला येणाऱ्यांसाठी मानाच्या पाचही गणपतींच्या जोडीने या भागात असलेली इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही तितकीच महत्त्वाची ठरतात. मंडळांनीही ही बाब लक्षात घेऊन आकर्षक पद्धतीने आरास करून नागरिकांचा रसभंग होणार नाही याची काळजी घेतलेली असते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button