breaking-newsपिंपरी / चिंचवड

नगरसेवक शैलेश मोरे यांना ‘डिस्चार्ज’, कोरोनावर केली यशस्वी मात

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भाजपचे नगरसेवक शैलेश मोरे यांनी यशस्वीपणे कोव्हिड 19, कोरोना आजारावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोरोनाचा प्रचंड उद्रेक असताना नगरसेवक शैलेश मोरे यांनी प्रभागातील नागरिकांना मदत केली. दरम्यान, लोकांशी संपर्क आल्याने त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. प्रभागातील मित्र परिवार आणि लोकांच्या आशिर्वादानेच कोरोनाची लढाई जिंकलो, अशी भावना शैलेश मोरे यांनी व्यक्त केली आहे. 

मुंबईनंतर पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. उच्चभ्रू सोसायटी आणि झोपडपट्टी भागात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाला. नागरिकांचे प्रचंड हाल झाले. अशात नगरसेवक शैलेश मोरे यांनी आनंदनगर, सासोयट्यांच्या परिसरात तसेच दाट लोकवस्तीच्या भागात स्वतः जाऊन तेथील नागरिकांना मदत केली. त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यापासून ते त्यांची घरगुती काळजी घेण्यापर्यंत कामकाज मोरे यांनी निष्ठेने केले.

दरम्यान, मोरे यांचा कोरोनाबाधीतांशी हायरिस्क कॉन्टॅक्ट झाल्याने ते सुध्दा बाधित झाले. गेल्या रविवारी त्यांनी स्वतःची कोव्हिड टेस्ट करून घेतली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी चिंचवड येथील बिर्ला रुग्णालयात उपचार घेतले. तब्बल आठ दिवसांच्या उपचारानंतर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच, त्यांना घरीच राहण्याचा सल्ला रुग्णालय व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे. 

नुकताच डिस्चार्ज मिळाला आहे. उपचार घेतल्यानंतर आता माझी शारिरीक प्रकृती स्थिर आहे. घाबरण्याचे कसलेही कारण नाही. लोकांनी दिलेले आशिर्वाद आणि मित्रांच्या सहकार्यामुळेच कोरोनाची लढाई यशश्वीपणे जिंकू शकलो. आता नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. 

शैलेश मोरे, नगरसेवक
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button