breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज चुरशीची लढत! पाहा कधी अन् कुठे होणार सामना

IND vs AUS 4th T-20 : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना आज संध्याकाळी ७ वाजता रायपूर येथे खेळवला जाणार आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांची मालिका खेळात आहे. यामध्ये भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. मात्र भारतीय संघाने आजचा म्हणजेच चौथा टी-२० सामना जिंकल्यास पाच सामन्यांच्या मालिकेवर कब्जा केला जाणार आहे.

श्रेयस अय्यरच्या पुनरागमनानंतर तिलक वर्माला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते असे मानले जात आहे. म्हणजेच सलामीवीर यशस्वी जैस्वाल व्यतिरिक्त भारतीय संघात ऋतुराज गायकवाड, इशान किशन आणि श्रेयस अय्यर हे टॉप-४ मध्ये असतील. टिळक वर्मा प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र या सामन्यात धडाकेबाज खेळाडू श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची शक्यता आहि तर कर्णधार सूर्यकुमार यादव पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला करू शकतो.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना आज १ डिसेंबर रोजी रायपूर येथे खेळवला जाणार आहे. हा सामना बेंगळुरूच्या एन. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याची सुरवात आज सायंकाळी ७ वाजता सुरवात होणार आहे. तसेच सामन्याच्या अर्धा तास आधी नाणेफेक होईल. प्रेक्षकांना या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क पाहता येईल. तसेच प्रेक्षकांना जर मोबाईलवर सामन्याचा आनंद घेयचा असेल तर JIOCINEMA वर पाहता येईल.

हेही वाचा  –  ‘सरकारमध्ये जा, मी राजीनामा देतो असं शरद पवार म्हणाले’; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

भारतीय संभाव्य संघ :

ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, रवी बिश्नोई, आवेश खान आणि प्रसिद्ध कृष्णा.

ऑस्ट्रेलिया संभाव्य संघ :

मॅथ्यू वेड (कर्णधार), आरोन हार्डी, जेसन बेहरेनडॉर्फ, सीन अॅबॉट, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन आणि अॅडम झाम्पा, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस.

उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक :

चौथा सामना : शुक्रवार, 01 डिसेंबर 2023 : विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, रायपूर
पाचवा सामना : रविवार, 03 डिसेंबर 2023 :राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, बॅंगलोर.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button