breaking-newsराष्ट्रिय

G-20 शिखर परिषद: योगासन भारताने जगाला दिलेली खास भेट- मोदी

जी २० शिखर परिषदेसाठी ब्यूनस आर्यस येथे आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील विविध देशातून आलेल्या शिष्टमंडळांना योगासनाचे महत्व सांगितले. ब्यूनस आर्यस येथे ‘शांततेसाठी योग’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ‘शांततेसाठी योग’ (पीस फॉर योग) हे अत्यंत योग्य नाव दिले असून यापेक्षा दुसरे कुठलेच नाव योग्य ठरले नसते. योग आपल्याला चांगले मानसिक व शारीरिक आरोग्य देते. आपला मेंदू आणि शरीर शांत ठेवण्याची ताकद या योगमध्ये असल्याचे ते म्हणाले.

View image on Twitter

ANI

@ANI

Today’s programme is called “Yoga For Peace”. It is difficult to find a better name than this for a yoga program. Yoga helps us acquire better mental and physical health. It gives strength to our body&peace to our mind: PM Modi at “Yoga For Peace” event in Buenos Aires, Argentina

३२ लोक याविषयी बोलत आहेत

तत्पूर्वी पंतप्रधान मोदी हे गुरुवारी सांयकाळी अर्जेंटिनाला पोहोचले. ते चार दिवसांच्या दौऱ्यावर असून २ डिसेंबर रोजी ते भारतात परतणार आहेत.

ANI

@ANI

In G-20 summit many issues will be discussed, such as global economy, sustainable development, climate change, fugitive economic offenders. These are in the interest of the entire world, not just India and Argentina: PM Modi at “Yoga For Peace” event in Buenos Aires, Argentina

३० लोक याविषयी बोलत आहेत

ते म्हणाले, जेव्हा व्यक्तिचा मेंदू शांत असेल तेव्हा कुटुंब, समाज, देश आणि जगातही शांतता कायम राहते. आरोग्य, कल्याण आणि शांततेसाठी जगाला भारताने दिलेली ही एक खास भेट आहे. तत्पूर्वी त्यांनी ओडिशा येथे आयोजित हॉकी विश्वचषकातील पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानिमित्त अर्जेंटिना संघाचे अभिनंदन केले आणि भारतीय हॉकी संघाला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.

जी-२० शिखर परिषदेत जागतिक मुद्दे, निरंतर विकास, जलवायू परिवर्तन, फरार आर्थिक घोटाळ्यातील आरोपींसारख्या मुद्यांवर चर्चा केली जाणार असल्याचे मोदी म्हणाले. हे फक्त भारत किंवा अर्जेंटिनाच्या फायद्याचे नाही तर यात जगाचे हित असल्याचेही त्यांनी म्हटले. यावेळी पंतप्रधानांची सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान अल सौद यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button