breaking-newsआंतरराष्टीयराष्ट्रिय

व्हॉट्सअॅपचं कार्यालय भारतात हवंच; केंद्राची स्पष्ट भूमिका

भारत दौऱ्यावर आलेले व्हॉट्सअॅपचे सीईओ ख्रिस डॅनियल्स यांनी मंगळवारी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली. केंद्राच्या वतीने मी व्हॉट्सअॅपच्या सीईओंना तीन सूचना केल्या आहेत, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. भारतात व्हॉट्सअॅपचे कार्यालय सुरु करावे, अशी आमची प्रमुख सूचना असल्याचे त्यांनी नमूद केले.

व्हॉट्सअॅपचे सीईओ ख्रिस डॅनियल यांनी मंगळवारी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली. व्हॉट्सअॅपवरुन पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि फेक न्यूज रोखण्यासाठी केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपला तंबी दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. या अफवांमुळे अनेकांना प्राणास मुकावे लागले असून या अफवांवर ठोस नियंत्रण मिळवणं गरजेचे असल्याचे सरकारनं स्पष्ट केलं आहे.

या भेटीनंतर रविशंकर प्रसाद यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आमच्यात तीन विषयांवर चर्चा झाली आणि व्हॉट्सअॅपने केंद्र सरकारच्या सूचनांची पूर्तता करण्याची तयारी दर्शवली, असे त्यांनी सांगितले.

Ravi Shankar Prasad

@rsprasad

CEO of Whatsapp Chris Daniels met me today. I appreciated the role of Whatsapp in empowering people and also shared country’s concerns about misuse of and requested him to take suitable steps to address those concerns. pic.twitter.com/SciU23wX7O

Ravi Shankar Prasad

@rsprasad

I requested CEO Whatsapp Chris Daniels to set up a grievance officer in India; establish a corporate entity in India & comply with Indian laws. He assured me that will soon take steps on all these counts. pic.twitter.com/0RoxQuSwSQ

View image on Twitter

Ravi Shankar Prasad

@rsprasad

CEO of Whatsapp Chris Daniels met me today. I appreciated the role of Whatsapp in empowering people and also shared country’s concerns about misuse of and requested him to take suitable steps to address those concerns.

भारतात व्हॉट्स अॅपचे कॉर्पोरेट कार्यालय सुरु करावे, भारतात तक्रार निवारणासाठी अधिकारी नेमावेत तसेच भारतीय कायद्याचे पालन करावे या तीन मुख्य सूचना भारत सरकारने केल्या आहेत. सद्य स्थितीत व्हॉट्स अॅपशी संपर्क साधायचा असल्यास अमेरिकेत बोलावं लागतं हे आम्हाला अमान्य असून ही यंत्रणा भारतातच असायला हवी असे प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button