breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत पहिलं ‘मँग्रोव्ह पार्क’; गोराईमध्ये कामाला सुरुवात

मुंबई – राज्यातील पहिलं ‘मँग्रोव्ह पार्क’ (mangrove park) गोराई  येथे उभे राहत आहे. राज्य सरकारने  2019 मध्ये याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर अखेर दोन वर्षांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मार्च 2023 मध्ये मँग्रोव्ह पार्कच काम पूर्ण होईल अशी माहिती मँग्रोव्ह फाउंडेशनने  दिली. मुंबईत मँग्रोव्हज पार्क  उभारण्यावर 2017 पासून विचार सुरू होता. गोराई आणि दहिसर येथील खाडी किनारी मँग्रोव्ह पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातील गोराई येथे पहिला प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बोरिवली येथील गोराई खाडी जवळील 8 हेक्टर जागेवर महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येत आहे अशी माहिती मँग्रोव्हज सेलच्या उप वनसंरक्षक अधिकारी निनू सोमराज यांनी दिली. मँग्रोव्ह पार्कचे काम सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाच्या परवानग्या आवश्यक होत्या. त्यातील केंद्र सरकार,मुंबई महानगरपालिका तसेच मुंबईत उच्च न्यायालयाच्या परवानग्या मिळवण्यात यश आले आहे. पार्क साठी आवश्यक जागेपैकी वनखात्याच्या अखत्यारीत नसलेली 0.2 हेक्टर जमीन हस्तांतरण करणे गरजेचे होते. ती जागा देखील हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती निनू सोमराज यांनी दिली.

प्रकल्पासाठी 26 कोटींचा खर्च

प्रकल्पासाठी 25.30 कोटी रूपयांचा खर्च करण्यात येणार आहे. मुंबई उपनगर जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून हा खर्च उभा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.पुढील दोन वर्षात मार्च 2023 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

-1600 चौ.मी. चे नेचर इंटरप्रिटेशन सेंटर

-800 मीटर लांबीचे मँग्रोव्हज बोडवॉक

-कायाकीन बोर्ड फॅसिलिटी

-पक्षी निरीक्षण बुरुज

-मँग्रोव्हज डिस्प्ले इन्फॉर्मेशन बोर्ड

-सूचना दर्शक फलक

आपल्याकडे मँग्रोव्हज मध्ये घाणीचे साम्राज्य दिसते. त्यामुळे मँग्रोव्हज बाबत लोकांमध्ये नकारात्मक भावना असते. लोकांचा हा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शिवाय लोकांना मँग्रोव्हजचे महत्व कळावे यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.

” दहिसर पार्क मध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे गोराई मँग्रोव्हज पार्कवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पुढील दोन वर्षात काम पूर्ण करून मँग्रोव्हज पार्कच्या माध्यमातून पर्यटन स्थळ विकसित करत आहोत.”

– वीरेंद्र तिवारी , मुख्य वनसंरक्षक अधिकारी , मँग्रोव्हज सेल

मुंबई उपनगरचे तत्कालीन पालकमंत्री विनोद तावडे यांच्या काळात या प्रकल्पकचा पाया रचला गेला.त्यांनी यासाठी खुप प्रयत्न केले होते. विद्यमान पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील या प्रकल्पाबाबत अनेक बैठका घेऊन त्यातील अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button