TOP Newsगणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडीपुणे

गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांची सजावट आणि घरातील गणपतीची आरास करण्यासाठी एलईडी दिव्यांच्या साध्या माळांपासून दिव्यांचे झाड आणि विद्युत रोषणाईचा नंदादीप

पुणे | गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांची सजावट आणि घरातील गणपतीची आरास करण्यासाठी एलईडी दिव्यांच्या साध्या माळांपासून दिव्यांचे झाड आणि विद्युत रोषणाईचा नंदादीप अशा विविध प्रकारच्या वस्तूंना मागणी आहे. शहराच्या मध्य वस्तीतील बाजारपेठेत विद्युत रोषणाईच्या वस्तूंनी बाजारपेठ फुलली असून, सायंकाळनंतर सर्वत्र रंगबिरंगी दिव्यांचा झगमगाट दिसतो.

दर वर्षी गणेशोत्सवासाठी नावीन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित विद्युत रोषणाईच्या वस्तू बाजारात येत असतात. गणरायाच्या आगमनासाठी आता मोजके दिवस राहिल्याने नागरिक खरेदीसाठी गर्दी करू लागले आहेत. एलईडी दिव्यांपासून तयार केलेल्या विविध माळा खरेदीकडे कल आहे.
दिव्यांचे झुंबर आणि नंदादीप नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

एलईडी दिव्यांचे झाड आणि कुंड्यांमधील दिव्यांच्या वेलींना पसंती मिळत आहेत. सजावटीला विविधरंगी विद्युत माळांची जोड देण्यासाठी एलईडी माळा, स्पॉट लाइट, कृत्रिम गुलाब पुष्पाच्या माळा, शंख-शिंपले, चांदणी आणि लाइट बॉलच्या माळा, झगमगती समई, कारंजे असे पर्याय उपलब्ध आहेत.

बाजारात विविध डिझाइनमधील मखरे दाखल झाली आहेत. त्यामध्ये ‘एलईडी लाइट्स’ असलेल्या मखरांचे यंदा आकर्षण आहे. मखराच्या नक्षीनुसार त्याच्यावर विद्युत दिवे लावण्यात आले आहेत. सजावटीत कायमच ‘डान्सिंग लाइट्स’ला प्राधान्य दिले जाते. यंदा देखाव्यासाठी ‘ब्लूटूथ’च्या आधारे संगीतावर चमकणारा दिवा आकर्षण ठरत आहे. त्यामुळे नागरिक मोबाइलद्वारे या दिव्याला चालू आणि बंद करू शकतात, अशी माहिती ओम सप्तर्षी यांनी दिली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button