breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

इन्स्टाग्रामवरची मैत्री पडली महागात! मुंबईत अल्पवयीन मुलीवर तीन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार

मुंबई – इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या मित्राच्या घरी वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन वेगवेगळ्या ठिकाणी गँगरेप झाल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून दोघांचा शोध सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

१६ वर्षीय अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामवरून काही मुलांसोबत ओळख झाली होती. त्यापैकी एका मित्रानं बर्थडे पार्टी ठेवली होती. सर्वजण मढ भागातल्या एका हॉटेलच्या बाहेर भेटले आणि तिथे त्यांनी बर्थडे सेलिब्रेट केला. त्यानंतर कारमध्ये ही एक केक कापण्यात आला. तेव्हा इंस्टाग्रामवरील दोन मित्रांनी पीडितेला कारमध्ये नेलं आणि तिच्यावर गँगरेप केला. या घटनेनंतर पीडित मुलीला मालाडमधील एका दुसऱ्या मित्राच्या घरी सोडण्यात आलं. येथेही तिच्या मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडित मुलगी घरी न जाता आपल्या एका मित्राच्या घरी गेली. तिथे देखील मित्रानं तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना 31 मे आणि 1 जूनच्या रात्री घडली.

16 वर्षांच्या मुलीच्या कुटुंबियांनी मालाड पश्चिमच्या पोलीस स्टेशनमध्ये तिच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पीडित मुलगी अल्पवयीन असल्यानं पोलिसांनी तात्काळ अपहरणाची तक्रार दाखल करत तपास सुरु केला. दरम्यान दुसऱ्या दिवशी दुपारी पीडित मुलगी स्वतःहून घरी परतली. ज्यावेळी ती घरी परतली तेव्हा खूप घाबरलेली आणि कमजोर दिसत होती. पीडित मुलीची तिच्या आई-वडिलांनी विचारपूस केली. मात्र तिनं काही सांगितलं नाही. त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांची टीम तिच्या घरी पाठवण्यात आली. सुरुवातीला पोलिसांनाही पीडित मुलीनं काही सांगितलं नाही. मात्र त्यानंतर तिनं घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.

या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि गँगरेप करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी 18 ते 23 या वयोगटातील आहेत. पोलिसांनी सांगितलं की, सर्व जणांची इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. दोन आरोपींचा अजूनही शोध सुरु आहे. तसंच सर्व आरोपींना पॉक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button