ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र

शिवजयंती निमित्त मोफतआरोग्य शिबीर उत्साहात

राष्ट्राय स्वाहा संस्थेच्या वर्धापनादिनानिमित्त मोफत आयुर्वेद आरोग्य शिबीर भारतीय संस्कृती संवर्धन संस्था येथे आयोजन

पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५व्या जयंतीचे तसेच राष्ट्राय स्वाहा! इदं न मम् म्हणत व आचरणात आणत आयुष्यभर राष्ट्रहितासाठी कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द्वितीय सरसंघचालक प. पू. माधव सदाशिवराव गोळवळकर (गुरुजी) यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्राय स्वाहा संस्थेच्या वर्धापनादिनानिमित्त मोफत आयुर्वेद आरोग्य शिबीर भारतीय संस्कृती संवर्धन संस्था येथे आयोजित करण्यात आले.

यावेळी या शिबिराचे उद्दघाटन प्रा.डॉ. प्रशांत साठे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेचे विशेष निमंत्रित सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी भारतीय संस्कृत संवर्धन संस्थेचे प्रचारक मा.प्रतिकजी भागवत , उद्दघाटक मा प्रा.डॉ.प्रशांत साठे,वैद्य.पाटणकर,वैद्य.वैंशपायन ,वैद्य केतन देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्राय स्वाहा संस्थेच्या या आरोग्यशिबिरासाठी वैद्य.धनंजय इंचेकर.वैद्य.सौ.राधिका मराठे, वैद्य. वैष्णवी कुलकर्णी, वैद्य. शुभम् गाडेकर, वैद्य. हितेंद्र गवांडे, वैद्य. अनिकेत खैरे यांनी दिलेल्या योगदानामुळे ही आरोग्य तपासणीची मोहीम उत्तमरित्या साकारली गेली.

यांनी नोंदिवला सहभाग…
या शिबीरासाठी धारपसर, मुकुंदराव तापकीर, सुधीरजी करंदीकर, प्रतिभाताई करंदीकर, प्रशांत तपस्वी, मोहनजी बागमार, सुनीलजी देवधर, अनिताताई तलाठी, जयंतजी भावे, जगन्नाथजी कुलकर्णी, गिरीष खत्री, अमोलजी डांगे, अमितजी झागडे यांच्यासह अनेकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला संस्थेच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन सुरेंद्र निरगुडे, विशाल कुलकर्णी, श्रीकांत मंडले, योगिनी डफळ, सुनील देवभानकर, अमरजाताई पटवर्धन, शैलेश पाटील, प्राजक्ता कुलकर्णी, श्रध्दा मराठे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button