breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गोळीबार

पुण्यात गुन्ह्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आज एका व्यक्तीवर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. हल्ला झालेली व्यक्ती बांधकाम व्यावसायिक असल्याचे समजते. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आज एका व्यक्तीवर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. हल्ला झालेली व्यक्ती बांधकाम व्यावसायिक असल्याचे समजतंय.

पुणे आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी एकावर गोळीबार झाल्याची घटना घडली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या एसबीआयच्या ट्रेझरीजवळ हा प्रकार घडला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. गुन्हे शाखेचे अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात काही चित्रण कैद झाले आहे का? याबाबतची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button