ताज्या घडामोडीसातारा

प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बस चालकांसाठी मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर

सातारा : प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा आणि स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बस चालकांसाठी मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर २०२३, रविवारी २० ऑगस्ट रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा येथे आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा विनोद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडला.

तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमा गांधी, नेत्र तंत्रज्ञ ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस संचालक प्रकाश गवळी, नेत्र तंत्रज्ञ एम. बी. शिंदे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप म्हेत्रे इ. मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली.

नेत्र तपासणी एम.वी.शिंदे, एन.डी. पिसे, वाय. व्ही. पाटोळे, एस. के. नायकवडी इत्यादी तंत्रज्ञ यांनी उपस्थित बस वाहनचालकांची नेत्र तपासणी केली. त्यामध्ये ९३ वाहनचालकांना दष्टीदोष आढळुन आला. त्यांना मोफत चष्मे वाटप करणेत येणार आहेत तसेच ज्या वाहनचालकांना मोतीबिंदू असल्याचा निर्दशनास आले. त्यांना शस्त्रक्रिया करणेसाठी स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय, सातारा येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

हेही वाचा – अजित पवार गटाचा थेट शरद पवारांवर हल्लाबोल!

आरोग्य तपासणी : डॉ. प्रमा गांधी यांनी वाहनचालकांच्या आरोग्याची तपासणी करून उपसिथत वाहनचालकांना समुपदेशन केले. तसेच रक्तदान, रक्तातील साखर, रक्तातील काविळ इ. तपासणी करुन निदान झालेल्या वाहनचालकांना औषधोपचार व त्याबाबत मार्गदर्शन केले. रक्तदाब व रक्तातील साखर यासाठी ईला ओतारी व मानसी सपकाळ यांनी काम पाहिले. रक्तातील कावीळ व एडस पावावत रुपाली कदम यांनी तपासणी व जनजागती केली. मौखिक आरोग्य दिपाली जगताप, अनिकेत गावडे यांनी तपासणी करून धूमपान विषयक जनजागती व कॅन्सर विषयक तपासणी केली.

मानसिक आरोग्य तपासणी: अपर्णा बल्लाळ यांनी बस चालकांचे मानसिक आरोग्य तपासणी करुन व त्याबाबत समुपदेशन केले.

वरीलप्रमाणे १५० बसचालकांची संपूर्ण आरोग्य व नेत्र तपासणी करुन ज्यांना दष्टीदोष आढळला त्यांना मोफत चष्म्यांचे वाटप पुढील टप्पयामध्ये करण्यात येणार आहे. तसेच रक्तदाब, रक्तातील साखर, दंतवैद्य इ. आजारावर औषधोपचार देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद चव्हाण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी रस्ता सुरक्षा बाबत मार्गदर्शन केले व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सर्व उपलब्धता केलेबाबत त्यांचे आभार मानन्यात आले. सदर उपक्रम प्रत्येक तालुकानिहाय राबविण्याचा मानस व्यक्त केला. प्रकाश गवळी यांनी सदर उपक्रमाचे स्वागत करुन बस चालकांनी वर्षातून एकदा तरी नेत्र व संपूर्ण आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन केले.

सदर शिबीर राबविण्यासाठी या कार्यालयातील मोटारवाहन निरीक्षक धनंजय कुलकर्णी, सुरेश माळी, गजानन गुरव, दिग्विजय जाधव, योगेश ओतारी व सहाय्यक मोटारवाहन निरीक्षक दाऊद मुश्रीफ, विनायक सुर्यवंशी, प्रसाद सुरवसे, राहुल घवरे, राजेंद्र दराडे, संग्राम देवणे, अमित रोकडे, सुप्रिया गावडे, मोनिका सांळुखे, तेजस्विनी कांबळे, मेघाराणी काशिद, शिवदिनी लाड, भारती इंगळे, शितल घाडगे यांनी योगदान दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button