breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघात

कार्यकर्त्यांना घातपात असल्याचा संशय सखोल चौकशीची मागणी

मुंबई : माजी मंत्री रामदास कदम यांचा मुलगा दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला काल रात्री 11 च्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ कशेडी घाटात चोळई येथे हा अपघात झाला आहे. या अपघातात आमदार योगेश कदम यांच्या चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर आमदार कदम सुदैवाने बचावले आहेत. त्यांना किरकोळ मार लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार योगेश कदम खेड कडून मुंबईच्या दिशेने जात असताना राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव डंपरने त्यांच्या वाहनाला धडक दिली. यात आमदार कदम यांच्या वाहनाचा चक्काचूर झाला आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने गाडीने नुकसान झाले आहे. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय आता कदम यांच्या कार्यकर्त्यांमकडून व्यक्त केला जात आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी या घटनेती सखोल चौकशी करण्याची मागणीही केली आहे. या अपघातानंतर धडक देणारा डंपर पलटी झाला. त्यानंतर डंपरचालक फरार झाला आहे. त्यामुळे हा घातपात असल्याचे बोलले जात आहे.
मी सुखरूप आहे. काळजी करू नका. आई जगदंबेच्या कृपेने आम्ही सर्व सुखरूप असल्याचा संदेश त्यांनी व्हिडीओ शेअर करून दिला आहे. तसेच पुढील कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होतील अशी माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button