पिंपरी / चिंचवड

माल पुरवण्याच्या बहाण्याने कंपनीची 65 लाखांची फसवणूक

पिंपरी l प्रतिनिधी

कंपनीला माल पुरवण्याच्या बहाण्याने कंपनीचा विश्वास संपादन करून दोघांनी 65 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 22 सप्टेंबर 2020 ते 23 मार्च 2022 या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडला.

पारसमल मोतीलाल जैन (रा. वसमत, जि. हिंगोली), किसन पंढरी थोरात (रा. असेगावपेन, ता. रिसोड, जि. वाशीम) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी राहुल राजेंद्र लटंगे (वय 28, रा. औंध पुणे. मूळ रा. डीगसर, कळंब, जि. उस्मानाबाद) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या कंपनीला घडी डीटर्जंट पावडर, क्रॅकजॅक आणि पारले बिस्कीट हा माल विकण्याच्या बहाण्याने कंपनीचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांनी आरोपींच्या बँक खात्यावर काही रक्कम पाठवली. त्यानंतर आरोपींनी प्रथम काही माल फिर्यादी यांच्या कंपनीला पाठवला. मात्र नंतर फिर्यादी यांच्या कंपनीकडून पैसे घेऊन त्यांना माल पाठवला नाही.

फिर्यादी यांच्या कंपनीला आरोपींबाबत संशय आल्याने कंपनीच्या टीमने आरोपींच्या पत्त्यावर भेट दिली असता आरोपी एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांनी संगनमताने फिर्यादी यांच्या कंपनीची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. आरोपी पारसमल याने 24 लाख 79 हजार 704 आणि आरोपी किसन याने 40 लाख 45 हजार 817 अशी एकूण 65 लाख 25 हजार 521 रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button