पिंपरी / चिंचवड

क्रीप्टोकरंसी स्वस्तात खरेदी करण्याच्या मोहात पाच लाखांची फसवणूक

पिंपरी l प्रतिनिधी

क्रीप्टोकरंसी पाच रुपये कमी दराने देण्याचे आमिष दाखवून तिघांनी मिळून एका व्यक्तीची पाच लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना सोमवारी (दि. 2) रात्री सव्वासात वाजता ताथवडे येथील एका हॉटेलवर घडली.

शुभम हवा (वय 22, रा. लातूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुष्पराज रामविलास गुप्ता (वय 49, रा. लोणी काळभोर, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम हा फिर्यादी यांचा मित्र विजय वाघमारे याच्याशी असलेल्या जुन्या ओळखीचा फायदा घेऊन फिर्यादी यांना युएसडीटी डॉलर ही क्रीप्टोकरंसी पाच रुपये दराने स्वस्त देतो असे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादी यांना ताथवडे येथील एका हॉटेलवर बोलावले. तिथे फिर्यादी यांच्याकडून पाच लाख रुपये घेऊन आरोपींनी फिर्यादी यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button