breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

रुग्णांच्या सूपमध्ये चक्क रक्ताचे कापसाचे बोळे; पुण्याच्या जहांगीर रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

पुणे – रुग्णाला दिलेल्या सूपमध्ये चक्क रक्ताने माखलेले कापसाचे बोळे आढळून आले आहेत. हा धक्कादायक प्रकार पुण्याच्या नामाकिंत  जहांगीर रुग्णालयात घडला आहे. याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याचा व्हिडीओ बनवून हा प्रकार उजेडात आणला आहे.
पुण्यात जहांगीर रुग्णालय हे नामाकिंत रुग्णालयापैकी एक आहे. या रुग्णालयाच्या उपहारगृहात रुग्ण आणि नातेवाईकांना विविध पदार्थ बनवून दिले जातात.  या रुग्णालयात एका रुग्णासाठी कॅटींगमधून सूप देण्यात आलं होतं. मात्र, या सूपमध्ये रक्ताने माखलेले कापसाचे दोन बोळे आढळून आले.  त्यामुळे रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

सूपमध्ये रक्ताने माखलेले कापसाचे बोळे आढळल्यावर रुग्णाला धक्का बसला. रुग्णाच्या नातेवाईकांनी या सर्व प्रकाराचा व्हिडीओ बनवत कोरेगाव पार्क पोलिसांत तक्रार दाखल केली. या रुग्णालय निष्काळजी पणामुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, रुग्णालय व्यवस्थापकांकडून या घटनेविषयी अद्याप कोणतही स्पष्टीकरण दिलेले नाही.

याबाबत महेश सातपुते म्हणाले की, जहांगीर रुग्णालयात 29 एप्रिल रोजी माझी पत्नी प्रसूतीसाठी दाखल झाली होती. त्याच संध्याकाळी त्यांना मुलगी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना सूप देण्यात आलं. सूप पिताना त्यांना सूपमध्ये रक्ताने माखलेले कापसाचे बोळे असल्याचं दिसून आलं. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महेश सातपुते यांनी मोबाईलमध्ये हा प्रकार कैद केला आणि कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली. घडल्या प्रकारानंतर जहांगीर रुग्णालय प्रशासनाने या घटनेशी संबंधित अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button