breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर..’; बबनराव तायवाडेंचा थेट इशारा

मुंबई | मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून राज्य सरकारने मसुदा देखील तयार केला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आम्हाला १० टक्के आरक्षण नकोय तर ओबीसीमधूनच आरक्षण देण्यात यावे, तसेच या अधिवेशनात सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात यावी, या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. यावरून ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी थेट इशारा दिला आहे.

बबनराव तायवाडे म्हणाले की, मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाला आमचा विरोध नाही. आज जे १० टक्के आरक्षण देण्याची तरतुद करत आहे. याबद्दल सरकारचे अभिनंदन करत आहोत. परंतु ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाला धक्का लागता कामा नये. तसेच मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देऊ नयेत. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणारी भुमिका या अधिवेशनात सरकारने घेतली तर ओबीसी पेटून उठेल, ओबीसी रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा     –      मराठा समाजाला १० टक्के आरक्षण कायद्याच्या मसुद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी!

मंत्रिमंडळाने संमत केलेल्या विधेयकानुसार मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण मिळणार आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात ज्या त्रुटी दाखवल्या त्या दूर करण्याचा प्रयत्न झाला आहे. तसेच मागसवर्ग आयोगाने ज्या शिफारशी केल्या त्या मान्य करण्यात आल्या आहेत. मसुद्यानुसार, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. मराठा समाजाला न्यायालयाच्या कसोटीवर उतरणारे आरक्षण देणार असल्याचे सरकारने म्हटले होते, असं ते म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. परंतु त्यांनी ही भूमिका बदलायला हवी. आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही तर आम्हाला आंदोलन करण्याची गरज नाही. मंत्रिमंडळ बैठकीत संमत झालेला पूर्ण अहवाल आल्यावर आल्यावर आपण अभ्यास करुन बोलणार आहोत. सगे सोयऱ्याबाबत कायदा करण्यापूर्वी हरकती आणि सूचनांवर सुनावणी करण्यात यावी, असंही बबनराव तायवाडे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button