breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का!

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसला बारामती लोकसभा मतदासंघातल्या पुरंदर भागामध्ये मोठा धक्का बसला आहे. पुरंदरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत.

अशोक टेकवडे हे २००४ ते २००९ दरम्यान पुरंदर हवेलीचे आमदार होते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळेंना बारामती लोकसभा मतदारसंघात मतांचं गणित जुळवण्यासाठी पुरंदरसाठी वेगळं नियोजन करण्याची आवश्यकता भासू शकते. भाजपकडून राष्ट्रवादीला रोखण्यासाठी मिशन बारामती आखण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अशोक टेकवडेंचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी मोठा धोका मानला जात आहे.

हेही वाचा – १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी? राहुल नार्वेकर म्हणाले..

दरम्यान, मी निर्णय घेतलाय की भाजपामध्ये प्रवेश करायचा. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला फोन केला. शिवाय माझी त्यांच्याबरोबर समोरासमोर बैठकही झाली. माझ्या लक्षात आलं की पुरंदरच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्याला काम करण्याची संधी आहे. देवेंद्र फडणवीसांनी ३०-३५ मिनिटांच्या आमच्या चर्चेत मला ज्या कोही गोष्टी सांगितल्या त्या मला योग्य वाटल्या. म्हणून मी हा निर्णय घेतला, असं अशोक टेकवडे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button