breaking-newsEnglishTOP Newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमुंबईराष्ट्रियविदर्भ

नामिबियातून आलेल्या ‘आशा’ने दिली गुडन्यूज; देशातील चित्त्यांची संख्या वाढणार

भोपाळ । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

देशात जवळपास सात दशकानंतर चित्ते पुन्हा आले आहेत. दक्षिण अफ्रिकेतून आठ चित्ते भारतात आणण्यात आले आहेत. भारतात चित्ते आल्यानंतर नागरिक त्यांना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. असं असतानाच आता आणखी एक गुड न्यूज समोर येत आहे. मध्य प्रदेशमधील कुनो नॅशनल पार्कमधील आशा मादी चित्ता गर्भवती असल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप याबाबत कोणीही अधिकृत दुजोरा दिला नसला तरी कुनो नॅशनल पार्कमध्ये वन अधिकारी या मादी चित्त्याची मॉनिटरिंग करत आहेत.

नामिबियातून तीन मादी चित्ता भारतात आणण्यात आले होते. त्यात आशाचा देखील समावेश आहे. आशा हे नाव खुद्द पंतप्रधान मोदी यांनी ठेवलं होतं. मादी चित्ता गर्भवती असल्याचे संकेत मिळत असताना वन अधिकाऱ्यांच्या मनातही आशा निर्माण झाली आहे. लवकरच भारतात चित्त्यांची संख्या वाढणार आहे. कुनोमध्ये प्रोजेक्ट चित्तावर बारकाईने नजर ठेवली जात आहे. आशा गर्भवती असल्याचे सर्व संकेत दिसत आहे. तिचे व्यावहारिक, शारीरिक आणि हार्मोनल बदलांमुळं ती गर्भवती असल्याचे स्पष्ट होतं आहे, असं प्रोजेक्ट चित्ता सांभाळणाऱ्या एका अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. मात्र, या संकेतावरुनच उत्सुक न होता आपल्याला ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

चित्ता संवर्धन फंडचे कार्यकारी अधिकारी लॉरी मार्कर यांनी म्हटलं आहे की, जर आशा गर्भवती असेल तर ही तिची पहिलीच वेळ आहे. जर, आशाला खरंच दिवस गेले असतील तर तिला एकांत आणि शांतता द्यायला हवी. तिच्या आजूबाजूला कोणालाही भटकू देता कामा नये. तसंच, तिच्या अधिवासात खाण्या-पिण्याची सोय करायला हवी.

आशा जंगलातून आली आहे त्यामुळं ती गर्भवती असण्याची शक्यता आहे. जर असं असेल तर चित्ता प्रोजेक्टसाठी ही एक महत्त्वपूर्ण घटना आहे. आशा चित्ताचा तणाव कमी करण्यासाठी रिकामी जागा व शांततेची गरज आहे. जेणेकरुन ती तिच्या बछड्याच्या पालन-पोषणावर लक्ष देऊ शकेल. आशानं जर बछड्याला जन्म दिला तर नामिबियातून आलेल्या आठ चित्त्यांनंतर हे भारतासाठी खास गिफ्ट ठरू शकेल, असंही लॉरी मार्कर यांनी म्हटलं आहे.

१७ सप्टेंबरला नामिबियातून आठ चित्ते मध्ये प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी या चित्त्यांना नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आलं. या चित्त्यांना त्यांचं नवीन घर मानवण्यासाठी खास तयारी केली आहे. मध्यप्रदेश वन विभागाकडून याकडे काटेकोरपणे लक्ष ठेवलं जात आहे. एका अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याची विनंती करत आशा गर्भवती असल्याची शक्यता बोलून दाखवली आहे. मात्र, हे स्पष्ट करण्यासाठी अजून काही आठवडे वाट पाहावी लागणार आहे. स्पष्ट करण्यासाठी ५५ दिवसांचा अवधी लागू शकतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button