breaking-newsआंतरराष्टीय

#CoronoVirus:अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोनाचा कहर; 24 तासांमध्ये 2300 पेक्षा जास्त मृत्यू

अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे अमेरिकेत दररोज 2 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. मंगळवारी 2335 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, त्याआधी एक दिवस अगोदर 1300 लोकांचा मृत्यू झाला होता. परंतु, अमेरिकेतील मृतांचा आकडा पुन्हा वाढला आहे. संपूर्ण जगभरातील कोरोना बाधितांपैकी जवळपास एक तृतियांश रूग्ण हे अमेरिकेत आहेत. येथे 12 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. न्यूयॉर्क, न्यूजर्सी, कैलिफॉर्निया अमेरिकेतील या शहरांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.

वर्ल्डोमीटरने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या बुधवारी सकाळपर्यंत 12 लाख 37 हजार 633 इतकी झाली आहे. तर एकूण 72,271 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अमेरिकेत आतापर्यंत दोन लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये सर्वाधिक 330,139 कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत. एकट्या न्यूयॉर्क शहरात 25,204 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर न्यूजर्सीमध्ये 131,705 कोरोना बाधितांपैकी 8,292 लोकांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त मैसाचुसेट्स, इलिनॉयस ही शहरंही सर्वाधिक प्रभावित झाली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button