ताज्या घडामोडीमराठवाडा

२ वर्षांनंतर प्रथमच कोल्हापूरचे शाहू स्टेडियम फुटबॉलप्रेमींनी हाऊसफुल्ल

कोल्हापूर | कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे तब्बल दोन वर्षांनंतर काल गुरुवारी प्रथमच कोल्हापूरच्या छत्रपती शाहू स्टेडियममधील फुटबॉल सामने सर्वांसाठी पाहण्यास खुले करण्यात आले. याचा लाभ शेकडो आबालवृद्ध फुटबॉलप्रेमींनी आवर्जून घेतला. हे स्टेडियम प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल झाले होते.

राज्य सरकारने कोल्हापूरसह १४ जिल्हे निर्बंधमुक्‍त केले आहेत. यामुळे क्रीडाक्षेत्रही पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यामुळे फुटबॉल सामनेही सर्वांना पाहण्यास खुले करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. फुटबॉल हंगाम काही दिवसांपूर्वी विनाप्रेक्षक सुरू करण्यात आला होता. फुटबॉलप्रेमींना सामने घरबसल्या मोबाईलवर पाहता यावे यासाठी ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष सामने पाहता येत नसल्याने फुटबॉलप्रेमी अक्षरश: बेचैन होते. लहान मुले तर स्टेडियमच्या सभोवती असणार्‍या लहान-लहान झरोक्यातून सामने पाहण्यासाठी कसरत करताना दिसत होते. मात्र अखेर प्रशासनाच्या सूचनेनुसार कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनने फुटबॉल सामने पाहण्यास खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तमाम फुटबॉलप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button