ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अधिष्ठातांना पाच लाख आगाऊ रकमेचा खर्च करण्याचा अधिकार

पिंपरी चिंचवड |

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे, साहित्य तसेच सर्व प्रकारची औषधांची खरेदी करण्यात येते. दहा लाख आणि पाच लाख रुपयांपर्यंत खरेदीचे अधिकार यापूर्वी महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय संचालक आणि वैद्यकीय अधीक्षक यांना प्रदान केले होते, परंतु या अधिकाऱ्यांना दिलेले हे खरेदीचे अधिकार रद्द करण्यात आले. 25 ऑक्टोबर 2021 रोजीच्या आदेशानुसार, नव्याने विभागप्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

त्यानुसार, वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर पदवी संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे यांना विभागप्रमुख म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार, डॉ. वाबळे यांच्या कार्यकक्षेत वायसीएम रुग्णालयाचे कामकाज आहे. कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने स्थायी अग्रीमधनाची पाच लाखांची रक्कम खर्च करण्याचे अधिकार अधिष्ठाता यांच्या नावाने करण्यात येणार आहे. त्यानुसार, डॉ. वाबळे यांना रुग्णालयीन अत्यावश्यक तातडीच्या कामकाजाकरिता अधिकार प्रदान करणे आवश्यक आहे. वायसीएम रुग्णालयाची गरज लक्षात घेऊन तातडीने आवश्यक असणारे सर्जिकल साहित्य, आवश्यक असलेली उपकरणे दुरुस्तीसाठी विविध पार्ट, कुकिंग गॅस, ऑक्सिजन गॅस तसेच कोरोना अंतर्गत वायसीएम रुग्णालय व जम्बो कोरोनासाठी तातडीने खरेदी करावी लागते.

तसेच, ऑक्सिजन जम्बो सिलिंडर खुल्या बाजारातून उपलब्धतेनुसार आणि बाजारातील दरानुसार खरेदी करणे तसेच आवश्यकतेनुसार कार्यालयीन स्टेशनरी, साहित्य, संगणक स्टेशनरी, संगणक साहित्य आदी किरकोळ खर्च करण्याचे अधिकारही अधिष्ठाता यांना देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार, सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये स्थायी अग्रिमधनातून होणारा खर्च ‘मध्यवर्ती भांडार विभागाकडील इतर खर्च’ या लेखाशिर्षातून खर्च करण्याचा अधिकार रुग्णालयाचे विभागप्रमुख तथा अधिष्ठाता डॉ. वाबळे यांना देण्यास मान्यता देण्यात येणार आहे. याशिवाय, सन 2022-23 पासून पुढे स्थायी अग्रिमधनाचा खर्च करण्याचे अधिकारही डॉ. वाबळे यांना देण्यात येणार आहेत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button