breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

घरगुती बाप्पा शाडूचाच हवा! प्रशासनाकडून मूर्तिकार, विक्रेत्यांसाठी नियमावली जाहीर

मुंबई : गणेशोत्सवाला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी राहिला आहे. मूर्तीकारांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे पालिकेने मूर्तिकार, विक्रेत्यांसाठी एक नियमावली जाहीर केली आहे. मूर्ती शाडू माती आणि पर्यावरणपूरक घटकांपासून घडवलेली असावी, तेसच घरगुती मुर्ती चार फुटांची असावी, असे बंधनकारक करण्यात आले आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिकेने पहिली नियमावली जाहीर केली आहे. यासोबतच मुर्तीकारांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यानुसार मूर्तिकारांनी पर्यावरणपूरक मूर्ती असल्याबाबतचा फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक राहील. तर सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांनी पर्यावरणपूरकच गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा – Maharashtra Rain : सिंधुदुर्ग, सोलापूरला ऑरेंज अलर्ट, तर ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मूर्ती पर्यावरणपूरत असल्याचे समजण्यासाठी मूर्तीच्या मागे उजव्या खांद्यांवर हिरव्या रंगाचे वर्तुळ आणि पीओपीची असल्यास लाल रंगाच्या वर्तुळाचे मार्किंग करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

अशी आहे नियमावली

  • घरगुती गणेशोत्सवासाठी मूर्ती चार फुटांचीच असावी.
  • सर्व घरगुती मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे.
  • कमी उंचीच्या सार्वजनिक मूर्तींचे विसर्गन कृत्रिम तलावात.
  • मूर्तिकारांना मंडपासाठी ऑनलाइन पवानगी मिळणार.
  • परवानगीसाठी विभाग कार्यालयातही अर्ज करता येणार.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button