पिंपरी कॅम्प परिसरातील फुल विक्रेत्यांची घबाडसष्ठी उत्साहात साजरी
पिंपरी चिंचवड | सालाबाद प्रमाणे फुल विक्रेत्यांची घबाडसष्ठी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वर्षभरातील व्यवहार सुरळीत करण्यात आले. तसेच दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांना बोनस तसेच शेतकऱ्यांचा जुना व्यवहार पुर्णपणे क्लिअर करण्यात आला,दुकानातील काटा माप, बीलबूक, वर्षभरातील थकबाकी हिशोब करून व्यवहार सुरळीत केला जातो. आपल्या दुकानाला फूलांचे आकर्षक तोरण बांधून सजावट करूण घबाडसष्ठी साजरी करण्यात आली. असे फुल विक्रेते गणेश आहेर यांनी संगितले.
यावेळी फूल बाजाराचे अध्यक्ष राजकुमार मोरे, बाजार समिती विभागप्रमूख राजु शिंदे साहेब, दत्ताञय फुले, शिवाजी सस्ते, गणेश आहेर, बाबा रासकर, संजय बोडके, मिना आहेर, सुनील काळे, दत्तात्रय ठाक्कर, बाबा तापकिर, मामा राक्षे, नितीन रासकर, अजय हांडभर, प्रणित बडदे, बाळु वाघोले, संतोष जाधव, संतोष फुले, शाम मांडगे उपस्थित होते.