breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

पिंपरी : रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम चिंचवड काळभोरनगर येथील जेट इंडिया महाविद्यालयाच्या कॅम्पस हॉल मध्ये आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त 3 मा.उल्हास जगताप साहेब,शिक्षण अधिकारी मा.संजय नाईकडे साहेब होते.प्रमुख उपस्थिती जेट इंडिया च्या CEO मा.शिरीन वस्तानी तसेच माजी API मा.गुलाम शेख उपस्थित होते…कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे होते.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अतिरिक्त आयुक्त ३ मा.उल्हास जगताप साहेब यांनी विद्यार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या शैक्षणिक योजनांची माहिती देऊन त्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी संजय नाईकडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे मत व्यक्त केले कि शिक्षण घेऊन मोठ्या मोठ्या पदावर गेलेच पाहिजे, पैसे कमावले पाहिजे पण त्याचबरोबर आपण एक चांगला माणूस देखील बनले पाहिजे. पद प्रतिष्ठा यासोबत माणुसकीचा देखील आदर्श गुण आपण आपल्यामध्ये जोपासला पाहिजे.तसेच अध्यक्षीय भाषणात धम्मराज साळवे सर यांनी असे मत व्यक्त केले कि विद्यार्थ्यांना वेळोवेळी कौतुकाची थाप दिली पाहिजे त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला पाहिजे. याकरीता रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी शैक्षणिक उपक्रम राबवले जातात.यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा – संत निरंकारी मिशनचा क्षेत्रिय इंग्रजी माध्यम संत समागम उत्साहात

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली कावरे ,संविधान प्रास्ताविकेचे वाचन सोमनाथ पाटील,कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम विक्रांत शेळके व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव अमर मुनेश्वर यांनी केले.या कार्यक्रमासाठी जेट इंडिया अव्हिएशन व हॉस्पिटीलीटी मॅनेजमेंट या संस्थेने विशेष सहकार्य केले.

यावेळी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे ,प्रदेश महासचिव संतोष शिंदे,सचिव नीरज भालेराव, सचिव अमर मुनेश्वर संघटक रोहित कांबळे,सहसचिव प्रगती कोपरे,समनव्यक श्वेता ओव्हाळ,भाग्यश्री आखाडे , तेजस्विनी वाघमारे,प्रणाली कावरे,सोनल म्हसकर,सोमनाथ पाटील, अतुल वाघमारे,विक्रांत शेळके,सागर गायकवाड,अजय चक्रनारायण, अभिषेक चक्रनारायण, मयूर जगताप,गाझी शेख,कारण कांबळे,समाधान गायकवाड, महेश गायकवाड,संकेत यशवंते,अभिजीत लगाडे,प्रीतम वाघमारे,निखिल उबाळे,जयेश जाधव,वैभव पाटील,किशीर शेळकंदे ,अक्षय गायकवाड ,स्वराज कांबळे ,जीवन साळवे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button