breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

स्पेनला महापूरचा तडाखा; २ पर्यटकांचा मृत्यू

माद्रिद – स्पेनला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे मध्य आणि पूर्व भागात अनेक ठिकाणी महापूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तार्रागोना, कॅस्टेलॉन आणि टोलेडो या प्रांतांना मोठा फटका बसला आहे. वादळ आणि पावसामुळे येथील परिस्थिती बिकट बनली आहे. माद्रिदमध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून अनेक वाहने वाहून गेली आहेत. यात जर्मनीच्या २ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे.

हवामान विभागाने गुरुवारी स्पेनमध्ये यलो अलर्ट जाहीर केला होता. त्यानुसार स्पेनमध्ये ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस पडला. यामुळे माद्रिदसह अनेक शहरे जलमय झाली. अशा परिस्थितीत मल्लोर्का बेटावर पोहण्यासाठी गेलेले जर्मनीचे २ पर्यटक बुडून मरण पावले. पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे रेल्वे सेवा आणि रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्यामुळे अनेक वाहने बंद पडली आहेत. काही वाहने अक्षरशा वाहून समुद्रात गेली. स्पेनमध्ये केवळ अर्ध्या तासात ७७ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली. यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. पावसामुळे अनेक घरे कोसळली असून पुरात अडकलेल्या शेकडो लोकांना अग्निशामन दलाच्या जवानांनी सुखरूपपणे बाहेर काढले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button