breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदारांच्या सांगण्यावरुन स्थायी सभापती ब्लॅकमेल करताहेत – शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांचा गंभीर आरोप

खाजगी वाटाघाटीने भूसंपादन प्रस्ताव रेंगाळला, स्थायीत उपसूचनेला मान्यता देवून महासभेकडे शिफारस

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खाजगी वाटाघाटीने जागा भूसंपादन करण्याच्या उपसुचनेवरुन आज (बुधवारी) झालेल्या सभेत स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी आणि शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांच्यात तु-तु मै-मै झाले. यावरुन चिंचवड आमदाराच्या सांगण्यावरुन स्थायी सभापती जमिन मालकांना ब्लॅकमेल करु लागलेत, असा आरोप शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच त्या उपसुचनेला कलाटे यांनी विरोध दर्शविला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील खाजगी वाटाघाटीने भूसंपादन करताना संबंधित जमिन मालकास मोबदला अदा करताना कार्यपद्धती व धोरणानूसार कार्यवाही करण्याबाबत उपसूचना आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समितीत ऐनवेळी मान्यता देवून महासभेकडे शिफारस करण्यात आली.

महापालिका सभा ठराव क्रमांक 774 हा दिनांक 20 नोव्हेंबर 2015 अन्वये सदर धोरणात बदल करुन नवीन भूसंपादन कायदा 2013 मधील तरतूदी नुसार ज्या मिळकत धारकांचे क्षेत्र 0 ते 300 चाै.मी. आहे. अशा बाधित छोट्या मोठ्या मिळकतधारकांना 100 टक्के दिलासा रक्कम व 300 चाै.मी. पेक्षा जास्त क्षेत्राचे भूखंडधारकांना 30 टक्के दिलासा रक्कम या प्रमाणे मान्यता देण्यात आली आहे. तसेच 20 नोव्हेंबर 2015 नंतर 300 चाै.मी. पेक्षा मोठ्या भूखंडाचे विभाजन करुन तुकडा 300 चाै.मी. पेक्षा कमी क्षेत्राचा भूखंड केलेल्या सर्व प्रकरणात सात्वंना रक्कम 30 टक्के इतकीच देय राहील. त्या उपसूचनेला मान्यता देवून ती महासभेकडे वर्ग करण्यात आली.

यावरुन कलाटे यांनी त्या उपसुचनेला विरोध दर्शविला असून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सांगण्यावरुन स्थायी सभापती मडिगेरी हे संबंधित शेतकरी आणि जागा मालकांना वेठीस धरु लागले आहेत. तसेच स्थायी सभेत यापुढे सभापतीच्या परवानगीशिवाय सदस्यांना उत्तर द्यायचे नाही. मी सांगेल तेव्हाच बोलायचे, असा वटहूकुम स्थायी सभापतींनी देवू लागले आहेत. त्यामुळे सभापतींनी दादागिरी वाढू लागल्याचा आरोपही त्यांनी केला.

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जागेचे भूसंपादन करताना महापालिकेच्या पैशाची बचत व्हावी, महापालिकेच्या पैशाची अतिरिक्त लूट होवू नये, यासाठी ही उपसुचनेला मान्यता देवून महासभेकडे वर्ग केलेली आहे. आम्ही हेतू पुरस्कृत काम करीत नाही. तर केवळ प्रसिध्दी मिळावी म्हणून स्टंटबाजी करीत नाही, असे स्थायी सभापती विलास मडिगेरी यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button