TOP Newsआंतरराष्टीयक्रिडाताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपुणे

पुण्यात राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते,  कलाकार, पत्रकार आणि उद्योजक भिडणार क्रिकेटच्या मैदानात

भीमयोद्धा फाउंडेशन आयोजित मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा २९, ३० आणि ३१ मे रोजी रंगणार

पुणे :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम योद्धा फाउंडेशन आयोजित क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि छत्रपती कलाकार लीग निमंत्रित स्वर्गीय डी.बी देवधर स्मरणार्थ मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा येत्या २९, ३० आणि ३१ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती आयोजक आयोजक ॲड मंदारभाऊ जोशी- भीमयोद्धा फाउंडेशन, संदीप खर्डेकर- क्रिएटिव्ह फाउंडेशन, रमेश परदेशी- छत्रपती कलाकार लीग यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला भीमयोद्धा फाउंडेशन चे ऍड मंदार जोशी,क्रिएटिव्ह फाउंडेशन चे संदीप खर्डेकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा चे मेघराज राजेभोसले,काँग्रेस आय चे प्रदेश उपाध्यक्ष संगीता तिवारी ,राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ता ऍड रुपाली पाटील,शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे)उमेश गलिंदे,महा एन जी ओ चे शेखर मुंदडा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव,मनसे चे सागर पाठक,योगेश सुपेकर, मिलिंद कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते. 

मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट  या स्पर्धेत भाजप, शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना ठाकरे गट,  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मनसे, मराठी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, पत्रकार आणि कलाकार यांच्या टीम सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा  येत्या २९,३०आणि ३१ मे २०२३ रोजी गेम ऑन स्पोर्ट्स ग्राऊंड, म्हात्रे पुलाजवळ, कर्वेनगर, कोथरूड येथे  सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत रंगणार आहे.

मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,  राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, माजी खासदार संजय काकडे, क्रीडा पत्रकार सुनंदन लेले, अभिनेते समीर धर्माधिकारी, सुरेश विश्वकर्मा आदि मान्यवर स्पर्धेला भेट देणार आहेत. 

या  स्पर्धेच्या निमित्ताने  भीमयोद्धा फाउंडेशनच्या वतीने  ऑनलाइन व डिस्टंस लर्निंग साठी युवा सामाजिक, राजकीय कार्यकर्त्याला स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. तसेच  ज्येष्ठ क्रिकेटपटू अन्वर शेख, महिला क्रिकेट निवड समिती अध्यक्ष संगीता गद्रे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे असे आयोजकांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button