ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कॉर्पोरेट रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहात, रामचंद्र मायदेव यांची अध्यक्षपदी निवड

पिंपरी चिंचवड  | रोटरी क्लब चिंचवड-पुणे पुरस्कृत रोटरी क्लब स्कॉन प्रो या भारतातील दुसऱ्या आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 मधील पहिल्या कॉर्पोरेट रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. कॉर्पोरेट रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी रोटेरिअन रामचंद्र मायदेव यांची निवड करण्यात आली आहे. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3131 चे प्रांतपाल रोटेरिअन पंकज शहा यांच्या हस्ते मायदेव यांना क्लब ची सनद (चार्टर) देण्यात आली. पी वाय सी क्लब, डेक्कन जिमखाना, पुणे येथे शुक्रवारी (दि.04) हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी स्कॉन प्रोजेक्ट्सचे अध्यक्ष निलेश चव्हाण, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे मेम्बरशिप डायरेक्टर रोटेरिअन शीतल शहा, मेम्बरशिप समिती प्रमुख रोटेरिअन ब्रिज सेठी, रोटरी क्लब चिंचवडच्या अध्यक्ष रोटेरिअन डॉक्टर शिल्पा गौरी गणपुले, सेक्रेटरी रोटेरियन प्रसाद गणपुले, नवनिर्वाचित चिटणीस रोटेरियन राहुल पूरकर, नियोजित अध्यक्ष रोटेरिअन अंजली काळे आणि फर्स्ट लेडी अंजली मायदेव माजी प्रांतपाल रोटेरियन रवी धोत्रे, रोटेरियन प्रमोद जेजुरीकर, रोटेरियन मोहन पालेशा, रोटेरियन दीपक शिकारपूर, रोटेरियन अभय गाडगीळ तसेच फाउंडेशन डायरेक्टर, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 रोटेरियन पंकज पटेल, सहाय्यक प्रांतपाल रोटेरियन डॉ. शुभांगी कोठारी, रोटरी क्लब चिंचवड पुणेचे सदस्य रोटेरिअन किशोर गुजर, रोटेरिअन सुरेंद्र शर्मा, रोटेरिअन हर्षा जोशी, रोटेरिअन प्रमोद जाधव आणि रोटेरिअन अजित कोठारी उपस्थित होते.

स्कॉन कंपनीच्या 38 कर्मचाऱ्यांनी यावेळी रोटरी क्लबचे सदस्यत्व स्वीकारले. रोटरी क्लब चिंचवडच्या अध्यक्ष रोटेरियन डॉ. शिल्पागौरी गणपुले यांनी प्रास्ताविक करताना रोटरी क्लब ‘स्कॉन प्रो’च्या नवीन सदस्यांना शुभेच्छा दिल्या. सल्लागार रोटेरियन प्रसाद गणपुले यांनी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे प्रांतपाल रोटेरियन पंकज शहा, मेंबरशिप समितीचे डायरेक्टर रोटेरिअन शीतल शहा,मेम्बरशिप समिती प्रमुख रोटेरिअन ब्रिज सेठी आणि रोटेरियन दप्तरदार यांचे कॉर्पोरेट क्लब स्थापनेसाठी लाभलेल्या सहकार्यासाठी विशेष आभार मानले.

‘आंतरराष्ट्रीय रोटरी जगतातील कॉर्पोरेट क्लब ही नवीन संकल्पना रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 ने उचलून धरली. सर्वसामान्यपणे वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रातील लोक एकत्र येऊन रोटरी क्लब ची स्थापना होते. परंतु कॉर्पोरेट क्लब अंतर्गत एकाच कंपनीतील लोक एकत्र येऊन रोटरी क्लब स्थापन करून रोटरीचे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून रोटरीच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकतात. रोटरीच्या माध्यमातून सदस्यांच्या व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास होऊन समाजाला कर्तृत्ववान नेतृत्व लाभते तसेच, सामाजिक विकासाला सकारात्मक वळण मिळू शकते,’ असे विचार प्रांतपाल रोटेरियन पंकज शहा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडले.

‘स्कॉन प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेड 2008 साली स्थापन झाली. स्कॉन भारत, इंग्लंड, अमेरिका, स्वित्झर्लंड, जर्मनी इत्यादी देशातील कंपन्यांसाठी बांधकाम प्रकल्प राबविते. कंपनीने आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. खेडेगावात स्वच्छतागृहे बांधण्यापासून ते सांगली, कोल्हापूर, चिपळूण येथील पूर परिस्थितीत स्थानिकांना मदत पोहोचण्यापर्यंत अनेक उपक्रम राबविले आहेत. रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्यक्रम करण्यास स्कॉन प्रो कंपनीला उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे,’ असे कंपनीचे अध्यक्ष निलेश चव्हाण म्हणाले.

‘नवे प्रकल्प अत्यंत दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण करणे ही स्कॉन कंपनीची खासियत आहे. स्कॉन प्रो, रोटरीच्या माध्यमातून भरीव सामाजिक कार्य करेल यात शंका नाही,’ अशी ग्वाही अध्यक्ष रोटेरियन रामचंद्र मायदेव यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटेरियन राहुल अवचट यांनी केले. सेक्रेटरी रोटेरियन राहुल पुरकर यांनी मानले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button