breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: नागपुरात 31 नवीन कोव्हिड-19 रुग्णालये होणार, मनपाचे आदेश, रुग्णालयांकडून मागवला अहवाल

नागपूर: कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागपुरात पुन्हा नव्याने 31 नियमित रुग्णालये आता डेडिकेटेड कोव्हिड रुग्णालयात परीवर्तीत होणार आहेत. यासंदर्भातील एक आदेश नागपूर महानगरपालिकेने निर्गमित केलेला आहे. पालिकेने 24 तासात संबंधित रुग्णालयांकडून सदर रुग्णालय कोव्हिड रुग्ण दाखल करून सज्ज असल्याबाबतचा अहवाल मागवलेला आहे. नागपुरात आता कोव्हिड (डीसीएच) रुग्णालयांची संख्या एकुण 62 झालेली आहे. पालिकेने दिलेल्या आदेशात नमूद केल्यानुसार, 24 तासात रुग्णालयांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील 48 तासात कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्ण संबंधित रुग्णालयांना भरती करता येणार आहे.

जे रुग्ण दाखल होतील त्यांच्यावर शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपचार करण्यात यावा, असेही आदेशात नमूद केले आहे. दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचा रिअल टाईम अहवाल मनपाच्या पोर्टलवर नियमित अद्यावत करणे अनिवार्य राहनार आहे. दरम्यान, नागपुरात कोरोनाचा वाढता प्रभाव बघता मास्क न घालणाऱ्यांवरही महापालिकेची जोरदार कारवाई सुरु आहे. उपद्रव शोध पथकांकडून कारवाई सुरु आहे. दोन दिवसात 467 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तर 93 हजार 400 रुपयांचा दंड आकारला आहे. नागपुरातील प्रत्यक झोनमध्ये कारवाई करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button