TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आंतर महाविद्यालय बुद्धिबळ स्पर्धेत पीसीसीओई संघाचा प्रथम क्रमांक

पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये बुद्धिबळ स्पर्धा संपन्न
पिंपरी |
पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) निगडी येथे आंतर महाविद्यालय बुद्धिबळ मुले व मुलींच्या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई)
मुलांच्या संघाने एकूण 22.5 गुण मिळवून सांघिक विजेतेपद पटकावले. तर मुलींमध्ये इंदापूर येथिल कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने विजेतेपद मिळविले.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शारीरिक शिक्षण विभागाचे माजी संचालक प्रा. शकूर सय्यद व प्रा. प्रमोद शिंदे, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सहसचिव डॉ. आशिष तळेकर, पीसीसीओईचे एस. डी. डब्ल्यू. डीन डॉ. प्रवीण काळे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत एकूण १८२ मुले व ७५ मुलींनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव डॉ. सुहास बहिरट, सहसचिव डॉ. आशिष तळेकर, कॅम्पस इन्चार्ज देवकर व डॉ. अजय गायकवाड उपस्थित होते. स्पर्धेचे नियोजन व आयोजन पीसीसीओईचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संतोष पाचारणे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष, ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, नरेंद्र लांडगे, धनंजय काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी स्पर्धेतील विजयी संघांचे व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेचा निकाल
सांघिक (मुले) :-

प्रथम क्रमांक :- पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी
द्वितीय क्रमांक :- राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, ताथवडे
तृतीय क्रमांक :- आय स्क्वेअर आयटी महाविद्यालय, हिंजवडी

सांघिक मुली :-
प्रथम क्रमांक :- कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, इंदापूर
द्वितीय क्रमांक :- एमआयटी महाविद्यालय, आळंदी
तृतीय क्रमांक :- सी. टी. बोरा महाविद्यालय, शिरूर

वैयक्तिक प्रकार निकाल
मुले

  1. देशपांडे अथर्व – टी. एस. एस. एम., नऱ्हे
  2. पाटील हर्षल – शरदचंद्रजी पवार महाविद्यालय, जेजुरी
  3. तेलंग यशवंत- पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी
  4. शेळके संकर्ष – पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी
  5. कांत स्वप्निल- सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स, आंबेगाव
  6. गोडबोले रौनक – राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, ताथवडे.

मुली :-

  1. खंडागळे यशकीर्ती- कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, इंदापूर
  2. वाळुंज श्रुती – डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, लोहगाव,
  3. शेरकर वैष्णवी – डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, आकुर्डी,
  4. काळे साक्षी- सी. टी. बोरा महाविद्यालय, शिरूर
  5. बेलोटे तृप्ती – सी. टी. बोरा महाविद्यालय, शिरूर
  6. धर्माधिकारी वैदेही – एस.ए.ई. कोंढवा.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button