breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

आधी महाआरती केली, नंतर मुस्लीम कार्यकर्त्याच्या घरी जेवण; वसंत मोरेंची पुन्हा चर्चा

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मशिदीवरील भोंगे खाली उतरविण्यास त्यांनी ४ तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिला. राज ठाकरेंच्या अल्टीमेटमनंतर बहुतांश मशिदीवरील भोंगे उतरले खरे पण काही मशिदींवरील भोंग्यावरुन नेहमीप्रमाणे अजान झाली. ४ तारखेला महाराष्ट्रात विविध ठिकाणी मनसे नेत्यांची धरपकड झाली. इकडे मुंबईत मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांनी आंदोलनाचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या शिताफीने त्यांच्या आंदोलनाला यश आले नाही. राज्यात असा सगळा गोंधळ सुरु असताना पुण्यातील मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे या प्रकरणात कुठेच दिसले नाहीत.

नंतर फेसबुक पोस्ट करुन आपण तिरुपतीला आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या तिरुपतीवारीच्या टायमिंगवरुन अनेक तर्कवितर्क लावले गेले. नंतर पुण्यात आल्यानंतर त्यांनी महाआरतीचा भव्य कार्यक्रम ठेवला. मुस्लिम बांधवांच्या हस्ते कात्रजमध्ये हनुमानाच्या महाआरतीचं आयोजन करुन राज्याचे लक्ष त्यांनी आपल्याकडे वेधले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. त्यांनी महाआरती आटोपल्यानंतर मुस्लिम मित्रांच्या, पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन ईदच्या मेजवानीचा आनंद घेतला. मित्रांबरोबर ईद सेलिब्रेट केलेले फोटोही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले. वसंत मोरे यांच्या याच फोटोंची चर्चा झाली नसती तरच नवल..!

  • महाआरतीनंतर वसंत मोरे यांचं मुस्लीम कार्यकर्त्याच्या घरी जेवण…

वसंत मोरे यांनी शनिवारी कात्रजमध्ये हनुमान मंदिरात महाआरती आयोजित केली होती. राज ठाकरे पुण्यात असल्याने या महाआरतीला येण्याची दाट शक्यता होती, तसं निमंत्रणही वसंत मोरे यांनी राज ठाकरेंना धाडलं होतं. पण पूर्वनियोजित कामामुळे राज ठाकरेंना महाआरतीला जाता आलं नाही. तत्पूर्वी, वसंत मोरे यांनी महाआरती आटोपल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे पुणे शहर सरचिटणीस आवेज भाई शेख यांच्या घरी जेवण केलं. वसंत मोरे यांच्यासोबत यावेळी मनसे पदाधिकारी सुनील अंधारे, शाखाध्यक्ष अमित अण्णा जगताप, शाखाध्यक्ष मंगेश रासकर होते.

  • वसंत मोरेंची राज ठाकरेंची भेट घेतली

    महाआरतीच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच वसंत मोरे यांनी ‘राजमहल’ या राज ठाकरे यांच्या पुण्यातील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. जवळपास अर्धा तासाच्या भेटीत दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. कालच्या महाआरतीला पुण्यातील विविध नेत्यांना निमंत्रण देऊनही काही जणांनी दांडी मारली. त्यांच्याबद्दल बोलताना ‘अतृप्त आत्मे’ म्हणत वसंत मोरे यांनी नाराजी दर्शवली अन् त्यांच्यावर निशाणाही साधला. याचविषयीची सविस्तर माहिती वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्याही कानावर घातली.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button