पिंपरी / चिंचवड

महिलेवर बलात्कार प्रकरणी फेसबुक फ्रेंडवर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

फेसबुकवरून मैत्री झालेल्या तरुणाने महिलेला हॉटेलवर नेऊन तिला मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे फोटो, व्हडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार जानेवारी 2021 ते 30 जानेवारी 2022 या कालावधीत वाकड आणि आंबेगाव येथील हॉटेलमध्ये घडली.

आर्यन शेख (वय 28, रा. वारणा, परभणी. सध्या रा. वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची फेसबुकवरून ओळख झाली. त्यानंतर फिर्यादीसोबत ओळख वाढवून आरोपीने महिलेला वाकड आणि आंबेगाव येथील हॉटेलमध्ये नेले. महिलेला मारहाण करून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तुझे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करेल, तुझ्या मुलीचे भविष्य खराब करेल अशा धमक्या दिल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक अजित काकडे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button