पिंपरी / चिंचवड

शस्त्राचा धाक दाखवून दुकानात दरोडा घालण्याचा प्रयत्न

पिंपरी l प्रतिनिधी

संभाजीनगर, चिंचवड येथील कस्तुरी मार्केट जवळ असलेल्या श्री महावीर प्लायवूड या दुकानात सहा जणांनी मिळून सशस्त्र दरोडा घालण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांना दुकानातील कामगारांनी विरोध केला असता आरोपींनी त्यांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करत जखमी केले. ही घटना शनिवारी (29) रात्री साडेआठ वाजता घडली.

रामसिंग देविसिंग राठोड (वय 45, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आदित्य अनिल पोटभरे (रा. अजंठानगर, चिंचवड), सौरभ वाघमारे (रा. घरकुल, चिखली), करण जालिंदर थोरात, मोनू उर्फ मोन्या शशिकांत लोंढे, हर्षल लहू आल्हाट, रोहन रघु पोटभरे (सर्व रा. चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आदित्य पोटभरे याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राठोड हे श्री महावीर प्लायवूड या दुकानात काम करतात. शनिवारी रात्री साडेआठ वाजता ते दुकान बंद करत होते. त्यावेळी आरोपी लोखंडी रॉड आणि लोखंडी सिखंजी घेऊन तिथे आले. विनाकारण दहशत निर्माण करून शिवीगाळ करत दुकानाच्या काउंटरकडे जाऊन दुकानातील गल्ला लुटण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी आणि त्यांचा सहकारी कामगार बाळू दहीवाडे यांनी प्रतिकार केला असता आरोपींनी त्यांना शस्त्रे दाखवत मारहाण करून जखमी केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button