breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबईराजकारण

भोंग्याविरोधात लढाई, भोंग्याच्या आवाजामुळे गुन्हा, राज ठाकरेंवर तीन कलमं, मनसे म्हणते, अटकेसाठी तयार!

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादेतील सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटी न पाळल्याने गुन्हाा दाखल झाला आहे. शहरातील सिटी पोलीस स्टेशनमध्ये राज ठाकरेंवर तीन कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. कलम ११६, कलम ११७ आणि कलम १५३ अंतर्गत राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या भोंग्याच्या आवाजावरुन राज ठाकरे यांनी रान उठवलं मात्र आपल्याच सभेत राज यांनी लाऊड स्पीकरच्या (भोंग्याची) आवाजाची मर्यादा पाळली नाही. पोलिसांनी राज ठाकरे यांना १६ अटी शर्थीचं पालन करण्यास सांगितलं होतं. मात्र राज ठाकरे यांनी त्यातील तब्बल १२ अटींचं उल्लंघन केलंय.

कलम ११६, कलम ११७ आणि कलम १५३ अंतर्गत राज ठाकरेंवर गुन्हा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्रदिनी औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या ऐतिहासिक मैदानात सभा पार पडली. या सभेला परवानगी मिळण्यावरुनही बराच वाद झाला. पण अखेर आठवडाभराच्या चर्चेनंतर पोलिसांनी आयोजकांना सभेसाठी परवानगी दिली. परवानगी देताना राज ठाकरे यांना १६ अटी घालून देण्यात आल्या. यामध्ये सभेसाठी लोकांची संख्या, लाऊड स्पीकरचा आवाज, आक्षेपार्ह वक्तव्य न करणं, चिथावणीखोर वक्तव्य न करणं, अशा अनेक अटी घालून देण्यात आल्या होत्या. पण यातील बहुतांश अटींचं राज ठाकरे यांनी उल्लंघन केलं. अखेर राज ठाकरेंसह सभेचे आयोजक राजीव जेवळीकर आणि इतर आयोजकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. कलम ११६, कलम ११७ आणि कलम १५३ अंतर्गत पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

राज ठाकरेंच्या अटकेसाठी मनसे तयार – अविनाश जाधव
राज ठाकरेंच्या सभेस मिळणारा प्रसिसाद उदंड आहे. लोक मोठ्या संख्येने त्यांच्या सभांना गर्दी करतात. राज ठाकरेंनी भोंग्याविरोधात भूमिका घेतल्याने काहींना मतपेटींची चिंता लागली आहे. पण आमची काही हरकत नाही. मनसे तयार आहे. राज ठाकरेंच्या अटकेसाठी मनसेची तयारी आहे, अशी प्रतिक्रिया ठाणे-पालघर जिल्ह्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button