breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अपना वतनचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयावर “चायपानी” आंदोलन

पिंपरी – शहरातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत व हफ्ते वसूल करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी,  या मागणीसाठी शनिवारी (दि. २५) दुपारी अपना वतन संघटनेच्या वतीने ” चायपानी ” आंदोलन करण्यात आले.

 

सुरवातीला पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. लोकशाही व सनदशीर मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनामध्ये पोलिसांनी दबाव आणून कार्यकर्त्याना अटक करण्याची धमकी दिली. परंतु, आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने व मागण्यांवर कायम राहिल्याने पोलिसांना नमते घ्यावे लागले.

 

यावेळी अपना वतनचे अध्यक्ष सिद्दीक शेख म्हणाले की, शहरातील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्त व सर्व वरिष्ठांना मार्च महिन्यापासून अनेक निवेदने दिली. अनेकवेळा आंदोलने केली. परंतु, पिंपरी-चिंचवड हद्दीतील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सर्रासपणे मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री, मटका, क्लब, वेश्या व्यवसाय असे अवैध धंदे पोलिसांच्या आशिर्वादाने खुलेआम सुरु आहेत. या अवैध धंद्यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा हफ्ता वसूल केला जात असल्याचे गंभीर आरोप त्यांनी केला. पुढील आठ दिवसांमध्ये शहरातील सर्व अवैध धंदे बंद करून हफ्ते वसुली करणा-या पोलिसांवर कारवाई न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांना दिला.

 

आंदोलनादरम्यान सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांनी संघटनेच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले व नेहमीप्रमाणे योग्य माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले. आंदोलनावेळी पोलीस आयुक्त कार्यलायाला छावणीचे स्वरूप आले होते. या आंदोलनामध्ये संघटनेचे सचिव दिलीप गायकवाड, कार्याध्यक्ष राजू शेरे, संपर्कप्रमुख हरिशचंद्र तोडकर, संघटक प्रकाश पाठारे, महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर, श्रद्धा सरवडेकर, मिलींदराजे भोसले, जितेंद्र जुनेजा, रहीम सय्यद, दुर्गापा देवकर, दिलीप देहाडे, अॅड. मोहन अडसूळ, युसूफ कुरेशी, वसीम पठाण, अब्दुल शेख, हेमलता परमार, निर्मला डांगे, तौफिक पठाण, फारुख शेख, दिवेश पिंगळे, मयूर गवळी, किरण धिंदळे, हमीद शेख, सतीश कदम, अश्रफ पठाण, अस्लम शेख, केशव बुडगल, आरती बुडगल आदी उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button