breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

हत्यार घेऊन TikTok व्हिडीओ काढण्याचा आगाऊपणा, पुण्यात तरुणावर गुन्हा

पुणे – गेल्या काही दिवसांपासून कुख्यात गुन्हेगारांचे Tik Tok व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. नागपूर आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हेगारांचे Tik Tok व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता पुण्यातील एका गुन्हेगाराने टीक टॉक व्हिडीओ तयार केला आहे.

दीपक आबा दाखले असे या तरुणाचे नाव असून त्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपकने परिसरात दहशत पसरवण्यासाठी टीक टॉक अॅपद्वारे एक व्हिडीओ तयार केला. यात त्याने ‘वाढीव दिसतंय राव…’ या लावणीवर व्हिडीओ तयार केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओत दहशत निर्माण करण्यासाठी दीपकने हातात कोयत्यासारखं धारदार शस्त्रही ठेवलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील पिंपरी परिसरात हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याच्या या व्हिडीओमुळे परिसरात प्रचंड प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे. वाकड पोलिसांच्या हाती हा व्हिडीओ लागल्यानंतर त्यांनी दीपकवर गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी त्याच्या घराभोवती सापळा रचत त्याला नुकतंच अटक केली. यानंतर त्याच्याकडून संबंधित शस्त्र जप्त करण्यात आलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी नागपूर आणि औरंगाबादमधील कुख्यात गुन्हेगाराने TikTok व्हिडीओ बनवत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. गुन्हेगारांनी बनवलेले हे TikTok व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारांच्या या टीक टॉक व्हिडीओमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button