ताज्या घडामोडीमुंबई

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 75 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार

मुंबई |  नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकर्यांना आता ७५ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात ही माहिती दिली. तसेच, भूविकास बँकांचे 34 हजार 788 कर्जदारांकडे असणारे 964 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची मोठी घोषणा अजित पवार यांनी केली.

शेतकऱ्यांसाठी काय घोषणा केल्या?

> हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारण्याची घोषणा अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली आहे.

> शेतकरी कल्याणासाठी अधिक अनुदान देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

> नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजारांऐवजी 75 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.

> दोन वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. त्याशिवाय गोसीखुर्द प्रकल्पासाठीच्या कामासाठी निधीची तरतूद करण्यात आली.

> कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला 50 कोटींचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली.

> पंतप्रधान सिंचन योजनेतून 11 प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

> जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटी रुपयांच्या निधीची तरतदू यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

> भरड धान्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

> शेततळ्यासाठीच्या अनुदानात वाढ करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.

> देशी गाई, बैलांची उत्पादकता वाढवण्यासाठी राज्यात तीन मोबाइल प्रयोगशाळा उभारणार

> प्रत्येक महसूल विभागात प्रत्येकी एक शेळी प्रकल्प

> या वर्षात 60 हजार कृषीपंपाना वीज देणार

> एक लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागा उभारण्याचे लक्ष्यं

> मुंबईतील पशूवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button