breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

UIDAI कडून आधार कार्ड नियमांमध्ये मोठे बदल

अनेक महत्त्वाच्या व्यवहारांसाठी आधार कार्ड गरजेचं आहे. अगदी बँक खात्यापासून ते पासपोर्टपर्यंत सर्वत्रच या आधारची गरज भासते. पण, अनेकदा आधार कार्ड तयार करतेवेळी नकळत झालेल्या काही चुकांमुळं त्यांच्यावर छापून आलेलं नाव, जन्मतारिख अशा गोष्टींमध्ये अनेक चुका आढळतात याच लहान चुका अनेकदा मोठ्या अडचणी उभ्या करतात.

आधार कार्ड धारकांपुढे येणाऱ्या याच अडचणी पाहता, UIDAI नं जन्म तारीख, नावातील बदल यासाठी काही नव्या अटी जारी केल्या आहेत. आता यापुढे मोबाईल क्रमांक आणि इतर माहितीसाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसणार आहे.

पाहुयात काय आहेत नव्या अटी
UIDAIकडून आधार कार्डवर जन्म तारीख अपडेट करण्यासाठी नवी अट घालून देण्यात आली आहे. जन्म तारीख बदलण्याच्या परिस्थितीमध्ये तीन वर्षांहून कमी अंतर असेल तर तुम्ही संबंधित कागदपत्रासह जवळच्या कोणत्याही आधार सुविधा केंद्रावर जाऊन हे बदल करुन घेऊ शकतो. तीन वर्षांहून जास्तीचं अंतर कागदपत्रांसह क्षेत्रीय आधार केंद्रात जाणं अपेक्षित असेल.

कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता?

जन्म तारखेच्या बदलासाठी जन्माचा दाखला, पॅन कार्ड, पासपोर्ट, लेटर हेटवर ग्रुप-ए गैजेटेड अधिकाऱ्याकडून मिळालेली प्रमाणित तारीख, ओळखपत्र, केंद्र शासनाच्या आरोग्य सेवेतील फोटो कार्ड किंवा माजी सैनिक असल्यास त्यासंबंधीचं ओळखपत्र , इयत्ता दहावी किंवा १२ वीचं प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा असला तरी चालणार आहे.

नाव चुकीचं छापलं गेल्यास काय करायचं ? आणि कोणती लागणार कागदपत्रे ?
आधार कार्डावर तुमचं नाव चुकीचं छापलं गेल्यास आणि तुम्ही त्यात बदल करु इच्छित असल्यास त्यासाठीसुद्धा मार्गदर्शक तत्त्वं जारी करण्यात आली आहेत. UIDAI च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नावात बदल करण्यासाठी आता केवळ दोनदाच संधी दिली जाणार आहे. यानंतरही नाव चुकीचं आल्यास, ते कार्ड अपात्र ठरवण्यात येणार आहे. ज्यानंतर आधार कार्ड धारकांनी नव्या कार्डासाठी आवेदन करणं आवश्यक असणार आहे. तसेच आधार कार्डवरील नावात बदल करण्यासाठी पॅनकार्ड, मतदान कार्ड, वाहन चालनाचा परवाना, शासकीय ओळखपत्र, शिक्षणाचं प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, पेंशनसाठीचं ओळखपत्र यांसारथ्या महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे. या महत्त्वाच्या कागदपत्रांसह आधार केंद्रावर जाऊन आधार कार्डवर छापण्यात आलेल्या चुकीच्या नावात बदल करण्यासाठीची पुढची प्रकिया करू शकतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button