breaking-newsताज्या घडामोडीमुंबईव्यापार

सोन्या-चांदीत घसरण! ५ दिवसांत सोने १,६९८ रुपयांनी स्वस्त झाले

मुंबई – सोन्या-चांदीच्या दरात ४ दिवसांपासून घसरण सुरू आहे. आज ५ व्या दिवशीही सोन्याच्या दरात १७३ आणि चांदीत दरात ८५६ रुपयांची घसरण झाली. यामुळे सोने ५ दिवसांत १,६९८ रुपये तोळा स्वस्त झाले असून चांदी ४,९११ रुपये किलो एवढी स्वस्त झाली आहे.

काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरू आहे. त्यामुळे ५६,२५४ या विक्रमी दरापासून सोने १० हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. काल सोन्याचा दर ४८,०५० रुपयांवर आणि चांदी ६८,२४१ रुपयांवर बंद झाली होती. मात्र आज सकाळी सोने ४६,३५२ रुपयांवर ओपन झाले, तर चांदी ६३,३३० रुपयांवर ओपन झाली. २३ कॅरेट सोन्याच्या दरातही १७३ रुपये तोळा एवढी घट झाली. २२ कॅरेट सोने १५९ रुपये आणि १८ कॅरेट सोने १३० रुपयांनी स्वस्त झाले आहे, अशी माहिती इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने वेबसाईटवर दिली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button