ताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ

शिवसेना आमदाराच्या घरावर बनावट IB अधिकाऱ्याची धाड, म्हणाला, ‘सगळी कागदपत्रं दाखवा’, पण काही क्षणांत बिंग फुटलं…

अकोला |  शिवसेना आमदार विल्पव बाजोरिया आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या बंगल्यावर ‘आयबीचा माणूस’ असल्याचे सांगत एक व्यक्ती घुसला. बंगल्यात शिरल्यावर समोरच्या सोफ्यावर बसून घर गाड्यांची कागदपत्रे मागू लागला. पण आमदारसाहेबांच्या कुटुंबीयांना काहीतरी वेगळी चाहूल लागली. त्यांनी त्याला बरोबर ओळखला. लागलीच त्याला बंगल्याबाहेर काढून बाजोरिया कुटुंबीयांनी या घडलेल्या प्रकरणी खदान पोलिसांत तक्रार दाखल केली. संबंधित आरोपीवर खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फोरव्हिलर घेऊन एक जण थेट आमदार बाजोरिया यांच्या बंगल्यात शिरला. गाडी पार्क करून बंगल्याच्या समोरील बाकावर जाऊन बसला. ‘मी आयबीचा माणूस आहे. तुमच्याकडे असलेल्या सर्व वाहनांचे आणि घराचे कागदपत्र दाखवा, असं म्हणत बाजोरिया यांच्या नातवासोबत त्याने वाद घातला. मात्र तो बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर लागलीच त्याला बंगल्याबाहेर काढून या प्रकरणी बाजोरिया कुटुंबियांनी खदान पोलिसांत तक्रार दाखल केली. यश अश्विनकुमार बाजोरिया यांच्या तक्रारीवरुन खदान पोलिसांनी प्रतिक संजयकुमार गावंडे (वय ३२, राहणार लेडी हार्डिग काँर्टर्स, अकोला) याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

मुर्तिजापूर रस्त्यावरील महाबीज कार्यालयाजवळ माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया, आमदार विप्लव बाजोरिया यांचा बंगला आहे. गुरुवारी ३१ मार्च रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान, MH ०४ FU ०९१९ क्रमांकाची कार बंगल्याचे पहिल्या माळ्यावरील पार्कींगमध्ये प्रतिक संजयकुमार गावंडे याने पार्क केली. त्यानंतर ‘तो’ गोपिकिशन बाजोरिया यांच्या बंगल्याचे समोरील बाकावर जाऊन बसला. त्याला पाहून यश अश्विनकुमार बाजोरिया यांना संशय आला. त्यानंतर यश आणि त्यांचे काका संजय बाजोरीया व सुनिल बाजोरीया त्याचे जवळ गेले. त्याची विचारपूस केली. त्यावर त्याने आपण ‘आयबीचा माणूस’ आहे, असे सांगून सर्व गाड्यांची कागदपत्रे तसेच चाव्या मागितल्या. दमदाटी करून त्यांनी दोन गाडयांची चावी घेतली. त्यानंतर घराचे कागदपत्र मागू लागला.

थोड्यावेळाने त्याचावर संशय आल्याने यश आणि त्यांच्या काकांनी त्याला ओळखपत्र मागितले. मात्र त्याने ओळखपत्र देण्यास नकार दिला. नाव, गाव विचारले असता, प्रतिक संजयकुमार गावंडे असे त्याने नाव सांगितले. एवढेचं नव्हे तर, तो घरात घुसण्याचा प्रयत्न करू लागला. पण, त्यास बाहेर जाण्यास सांगितले असता त्याने जबरदस्ती करत शिविगाळ केली व पाहून घेतो अधी धमकी दिली. यश यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भांदवि कलम ४५२, ५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला.

आरोपी प्रतिक संजयकुमार गावंडे याला वाहनांवर असलेल्या युनिक नंबरचे फोटो काढण्याचा शौक आहे, त्यामुळे तो सतत विविध वाहनांचे फोटो काढत असतोय, त्यामुळचं ‘तो’ फोटो काढण्यासाठी बंगल्यात गेला असावा, अशी माहिती समोर आली आहे..

बारोजिया यांच्या तक्रारीनंतर आरोपी प्रतिक गावंडे याला लागलीच अटक केली आहे, बंगल्यामध्ये त्याने आत शिरण्याचा प्रयत्न का केला याचाही तपास करणार आहे. सद्यस्थितीत मिळालेल्या माहितीनुसार ‘तो’ मानसिक तनावात असल्याचे सांगण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button