breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

“सर्वांचा हिशेब चुकता करणार…”, अमित ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यादरम्यान जोरदार पोस्टरबाजी

नाशिक |

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आजपासून पुन्हा एकदा नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. हा अमित यांचा तिसरा नाशिक दौऱा असल्याने आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसेने चांगलीच कंबर कसली असल्याचं यावरुन दिसून येत आहे.

अमित ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान नाशिकमध्ये जोरदार पोस्टरबाजी झाल्याचंही दिसून आलं. सर्वांचा हिशेब चुकता करणार असे पोस्टर्स नाशकात ठिकठिकाणी लावलेले दिसून आले. अमित ठाकरेंनी या दौऱ्यादरम्यान शाखा अध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांची भेट घेतली. तर त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने नाशकात पोस्टरबाजी करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. आता सर्व विरोधकांचा हिशेब चुकता होणार. हिशेबाची सुरुवात नाशिक नगरीतून होणार असे राज ठाकरे यांचा फोटो असलेले पोस्टर्स नाशकात ठिकठिकाणी लागलेले पाहायला मिळाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button