breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तुतारी चिन्हाचं अनावरण होत असतानाच भाजप नेत्याची जोरदार टीका

सोलापूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नव्या चिन्हाचं आज अनावरण होत आहे. किल्ले रायगडावर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मात्र जोरदार टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही टीका केली आहे. तुम्ही तुताऱ्या वाजवा… नाहीतर मशाली पेटवा. पण आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही ४५ पेक्षा जास्त जागा आम्ही निवडणूक आणू, असं म्हणत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार गट आणि ठाकरे गटावर टीका केली आहे.

तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा. परंतु महाराष्ट्रात ४५ आम्ही म्हणत होतो, पण तेही आता आम्ही क्रॉस करू अशी दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढत आहे. मोदींची जात, पात, धर्म, गट यांच्या पुढे गेलेले आहेत. मोदीजींनी लाभार्थी नावाचा गट निर्माण केला आहे. आणि तो असा म्हणतो की, विरोधी पक्षांचे राजकारण आता बास. आम्हाला फक्त मोदीजी पाहिजेत. त्याचा प्रत्यय आता दिसत आहे. दोन महिन्यापूर्वी झालेल्या देशातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुका, तीन राज्यातील निवडणुकीत भाजपला यश मिळाले, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता अजितदादांची; हवा रोहीतदादांची!

दिल्ली शेतकरी आंदोलनावरही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी समर्थ आहेत. नरेंद्र मोदी हे आपल्या मंत्र्यांच्या मदतीने संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून नक्कीच मार्ग निघेल. कुणी धमकी देण्याचं कारण नाही. मोदींच्या नेतृत्वाखाली जगात भारत स्ट्रॉंग झाला आहे. त्यामुळे अशा धमक्यांना घाबरायचं कारण नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मध्यप्रदेशच्या इतिहासात भाजपला एवढी मोठी यश मिळाले होते. हमको लाभ मिला है तुम जो करना है तो करो. पण निवडणुकीत शेवटपर्यंत विरोधी पक्षाने हार मानायची नसते. विरोधी पक्ष किंवा शरद पवारही म्हणतातआमच्या २०-२२ जागा येणार आहेत. मात्र राज्यात महायुती ४८ पर्यंत जाईल असे वाटतंय, असं चंद्रकात पाटील म्हणाले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button