ऋषभ पंतला भेटण्यासाठी उर्वशी रूग्णालयात?

मुंबई : भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतचा काही दिवसांपुर्वी अपघात झाला आहे. त्याच्यावर सध्या मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच विषयी आता उर्वशीने एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे आता तिच्या या पोस्टचा संबंध थेट ऋषभ पंतशी जोडला जात आहे.
अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि रिषभ पंत यांच्या अफेअर्सच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. त्यातच आता उर्वशीच्या या फोटोमुळे या चर्चांमध्ये भर पडली आहे. उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम एका रूग्णालयाचा फोटो शेअर केला होता. ती या रुग्णालयाच्या आजूबाजूला होती. या फोटोला उर्वशी काही कॅप्शन दिलं नव्हतं मात्र त्याला धीरूभाई अंबानी हॉस्पिटल असा लोकेशन टॅग होता. बुधवारी ऋषभ पंतला शस्त्रक्रियेसाठी डेहराडूनवरून मुंबईला आणण्यात आलं होतं. त्यानंतर उर्वशीची इन्स्टाग्राम स्टोरी पाहता अनेकांनी ती ऋषभला भेटण्यासाठी रुग्णालयात गेल्याचा अंदाज बांधला आहे.
दरम्यान २०२२ च्या अखेरीस म्हणजेच ३० डिसेंबरला ऋषभ पंतच्या कारला गंभीर अपघात धाला होता. तो दिल्लीतून रुडकी येथे परतत असताना नारसन बॉर्डरवरील हम्मादपूर येथे दुभाजकावर आदळली. दिल्ली- डेहराडून महामार्गावर हा अपघात झाला तेव्हा ऋषभ पंत कारमध्ये एकटाच होता. त्याच्या पाठीला, डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातानंतर ऋषभ कारच्या काचा फोडून बाहेर पडला आणि त्यानंतर ही कार जळून गेली होती. एवढ्या भीषण अपघातातून तो थोडक्यात बचावला आहे.






