सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; रिया चक्रवर्तीला क्लिनचीट, सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट

मुंबई : मोठी बातमी समोर येत आहे, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीला क्लिनचीट देण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्याच केल्याचं सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. रिया चक्रवर्ती विरोधात कुठलाही पुरावा न सापडल्यानं तिला क्लिनचीट देण्यात आली आहे. तब्बल चार वर्ष चार महिन्यांनी सीबीआयकडून कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे, त्यामध्ये सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्याच केल्याचं म्हटलं आहे.
सुशात सिंह राजपूत प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. सीबीआयने या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. या क्लोजर रिपोर्टमध्ये या प्रकरणातील मुख्य संशयित रिया चक्रवर्तीला क्लिनचीट देण्यात आली आहे. तिच्याविरोधात कोणतेही पुरावे न सापडल्यानं अखेर सीबीआयनं या प्रकरणाचा तपास बंद केला आहे. प्रकरणाच्या चार वर्ष चार महिन्यांनंतर सीबीआयकडून या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्याच केल्याचं या क्लोजर रिपोर्टमधून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा – ‘आर्थिक सक्षम होण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज’; पालकमंत्री डॉ. उदय सामंत
या सर्व प्रकरणामध्ये आतापर्यंत अनेकदा आरोप झाले आहेत. रिया चक्रवतीसह अनेकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले होते. सुरुवातीला मुंबई पोलिसांनी जो काही तपास केला होता, त्यामध्ये सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली आहे, यामध्ये कुठलाही संशय नाही असं मुंबई पोलिसांनी म्हटलं होतं. मात्र यामध्ये जेव्हा गंभीर स्वरुपाचे आरोप होऊ लागले तेव्हा या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता, आणि सीबीआयने या प्रकरणाचा आतापर्यंत म्हणजे चार वर्ष चार महिन्यांमध्ये तपास केला. त्यानंतर सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. यामध्ये सर्वात मोठी संशयित होती ती म्हणजे रिया चक्रवर्ती तिला क्लिनचीट देण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच होती असं सीबीआयनं आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या प्रकरणातील सर्वांना आता क्लिनचीट देण्यात आली आहे.