सोलापूरकरांसाठी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राहुल देशपांडे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित
सोलापूर मध्ये हिंदी आणि मराठी गीतांचा अनोखा नजराना

सोलापूर : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (ता. २५) सोलापूरकरांना प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या गायनात वारसा व नव्या शैलीचा असलेला संगम ‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ या भव्य लाईव्ह कॉन्सर्टद्वारे अनुभवता येणार आहे. एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी प्रस्तुत व ‘सकाळ माध्यम समूह’ आयोजित ही सुरांची पर्वणी सोलापूरकरांना मिळणार आहे. कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीस सोलापूरकरांनी विक्रमी प्रतिसाद दिला आहे.
राहुल देशपांडे कलेक्टिव्ह या लाईव्ह कॉन्सर्टची सोलापूरकरांना आतुरता लागून राहिली आहे. एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी प्रस्तुत व सकाळ माध्यम समूह आयोजित ‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ कार्यक्रमात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (ता. २५ जानेवारी) प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे हे सोलापूरकरांसाठी विविध गीतांचा नजराणा सादर करणार आहेत. शासकीय तंत्रनिकेतननजीक असलेल्या कर्णिक नगरातील स्व. लिंगराज वल्याळ मैदानावर ही लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे.
काय? ः ‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’
कधी? ः शनिवार, २५ जानेवारी २०२५
केव्हा? ः सायंकाळी ६ वाजता
कुठे? ः स्व. लिंगराज वल्याळ मैदान, कर्णिक नगर,
शासकीय तंत्रनिकेतनजवळ, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागे, सोलापूर
तिकीट विक्री सुरू
‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीस प्रारंभ झाला आहे. तिकीट बुकिंगसाठी बुक माय शोच्या https://in.bookmyshow.com/events/the-rahul-deshpande-collective-solapur/ET00427968 संकेतस्थळावरून बुकिंग करता येईल.
याशिवाय खालील क्रमांकावरून व सोबत दिलेल्या क्यूआर कोडद्वारे तिकीट बुकिंग करता येईल.
अधिक माहिती व तिकिटासाठी संपर्क
सुदर्शन – ९६०४९७०४६३
नीलम – ९५२७४९३८४४
सुरेश- ९९२२४३६१४२
महेश – ९२८४९९११९१
ताज्या दमाचा, नव्या पिढीचा आवडता सूर म्हणजे राहुलजी देशपांडे. तरुणांमध्ये शास्त्रीय संगीताची आवड निर्माण करणारी त्यांची गायकी ऐकण्याची संधी सकाळ माध्यम समूहामुळे सोलापूरच्या रसिकांना लाभते आहे. ही संधी म्हणजे शिशिरात फुललेला वसंतच होय.
– दीपक कलढोणे, ज्येष्ठ शास्त्रीय गायक