ताज्या घडामोडीमनोरंजन

संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी ‘स्पिरिट’ चित्रपटाची सर्वांनाच आतुरता

चित्रपटात दीपिका पदुकोणची जागी तृप्ती डिमरी

मुंबई : अॅनिमल चित्रपटाची क्रेझ निर्माण करणाऱ्या संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी म्हणजे ‘स्पिरिट’ चित्रपटाची सर्वांनाच आतुरता आहे. त्यात दीपिका पदुकोणचे नाव समोर आलं तेव्हा चाहत्यांनी आनंद व्यक्त केला होता. मात्र दीपिकाच्या वाढत्या मागण्या पाहता संदीपने रेड्डी वांगा यांनी दीपिकाला चित्रपटातून काढून टाकलं. दीपिकाच्या चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर सर्वांना हे जाणून घ्यायचं होतं की मग आता चित्रपटात दीपिकाची जागा कोण घेणार? त्याचं उत्तर आता चाहत्यांना मिळालं. दीपिकाच्या जागी आता अभिनेत्री तृप्ती डिमरी चित्रपटात दिसणार आहे.

दीपिकाच्या जागी आता तृप्ती दिसणार

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि प्रभासची जोडी एकेकाळी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसली आहे. ‘स्पिरिट’मध्येही ती दिसली असती मात्र दीपिकाच्या वाढत्या मागण्यांमुळे हे सर्व चित्र फिस्कटलं. आता दीपिकाच्या जागी आता तृप्ती दिसणार आहे.

तृप्ती डिमरीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून चाहत्यांना दिली माहिती

तृप्ती डिमरीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून चाहत्यांना याची माहिती दिली आहे. तृप्तीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिचे नाव वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिले आहे. यानंतर, खाली मोठ्या अक्षरात ‘स्पिरिट’ असं लिहिलं आहे. या पोस्टसोबत तृप्तीने लिहिले आहे की, या प्रवासात विश्वास मिळवल्याबद्दल मी खूप आभारी आहे. संदीप रेड्डी वांगा, तुमच्या स्वप्नाचा भाग असल्याचा अभिमान आहे, धन्यवाद.” असं म्हणत तिने सर्व संदीपने रेड्डी वांगा यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा –  जगात पुन्हा भारताचा डंका ; जपानला मागे टाकत भारत बनला जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

अभिनेता प्रभासकडूनही कमेंट्स

तृप्ती डिमरीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांकडून तसेच अभिनेता प्रभासकडूनही कमेंट्स आल्या आहेत. प्रभासने कमेंटमध्ये स्पिरिट लिहिले आहे सोबतच फायर और फायरी हार्ट असलेला इमोजी बनवला आहे. त्याच वेळी, तृप्ती डिमरीच्या चाहत्यांनी पोस्टवर हार्ट आणि किस इमोजी बनवून त्यांचा उत्साह दाखवला आहे.

दीपिका चित्रपटाचा भाग का नाही?

तुम्हाला सांगतो की, या चित्रपटासाठी दीपिकाला मोठी रक्कम मिळणार होती,तिच्या इतरही वाढत्या मागण्या पाहता संदीप वांगा यांनी तिला चित्रपटातून काढून टाकले. अनेक तेलुगू वेबसाइट्सनुसार असे म्हटले जात होते की दीपिकाची मागणी होती की ती फक्त 8 तास काम करेल अशी होती तसेच दीपिकाला चित्रपटाच्या नफ्यात वाटा हवा होता. दीपिकाच्या या मागण्यांमुळे संदीपने तिला चित्रपटातून काढून टाकल्याचं म्हटवं जात आहे. त्यामुळे आता तृप्ती डिमरीला आता अजून एक नव्या भूमिकेत पाहणं प्रेक्षकांना आवडतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button